वेदांता ग्रुपचा प्रस्तावित उद्योग महाराष्ट्रात पुन्हा आणावे…

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आज भंडारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सामोर आंदोलन करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा नावाने संदीप कदम जिल्हाधिकारी भंडारा यांचा मार्फत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांचा नेतृत्वात निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आपल्या निवेदनात सांगितले की राज्य सरकारच्या नाकारतेपणामूळे गुजरातला गेलेला वेदांत ग्रुपचा महाराष्ट्रातील उद्योग परत आपल्या राज्य सरकारने आपल्या राज्यात परत आणावे. राज्यातील शिंदे-भाजपा सरकारने वेदांत ग्रुपचा महाराष्ट्रातील उद्योग गुजरातच्या घशात घातला आहे. राज्यातील तरूणांना बेरोजगारीच्या खाईत लोटण्याचा महाराष्ट्र विरोधी उद्योग चालवणाºया शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज मंगळवार दिनांक २० सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. वेदांत ग्रुपकडून या प्रकल्पकरिता १.५० लक्ष करोड ची गुंतवणूक केली जाणार होती आणि त्यातून आपल्या राज्यात १.५० ते २ लक्ष बेरोजगार युवकाना रोजगार मिळणार होता. जाणूनबुजून हा प्रकल्प आपल्या राज्यातून गुजरात येथे स्थानांतर करण्यात आले. आपल्या राज्यावर हा अन्याय झाला आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या रोजगार उपलब्ध होणार होते.परंतु राज्य सरकारच्या नाकारते पणा मूळे गुजरात ला गेलेला हा वेदांत ग्रुपचा महाराष्ट्रातील उद्योग परत आपल्या राज्य सरकारने आणण्यासाठी प्रयत्न करून हा प्रकल्प आपल्या राज्यात परत आणावे व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावी, जर असे झाले नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आज जे आंदोलन लोकशाही मार्गाने शांतता करत आहे ते उद्या रस्त्यावर उतरून राज्याच्या बेरोजगार युवकांना साठी हिंसक आंदोलन करावे लागेल तरी मागेपुढे बघणार नाही. या साठी राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेत आमच्या महाराष्ट्र राज्यात वेदांत ग्रुप चा हा उद्योग सुरू करावा अशी मागणी या निवेदनाच्या मार्फत करण्यात आली.

जिल्हाधिकारी यांना निवेदन देत्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे, रजनीश बन्सोड जी.प.सदस्य, राजू देशभ्रतार जि.प.सदस्य, तालुका अध्यक्ष नरेंद्र झंझाड, युवक तालुका अध्यक्ष हितेश सेलोकर, अश्विन बांगडकर श.यु. अध्यक्ष, किरण वाघमारे, राजेंद्र मेहर रा.यु.का.तालूका अध्यक्ष, ठाकचंद मुगुसमारे रा.यु.का.तालुका अध्यक्ष तुमसर, राकेश राऊत ता.अध्यक्ष लाखांदुर, नागेश भगत प.स.सदस्य, सोनू खोब्रागडे, आशिष दलाल, आर्जू मेश्राम, मोहित पाटेकर, राहुल तीतीरमारे, रोहित बुरडे, प्रभाकर बोदले, नरेश येवले, आशिष रामटेके, मारोती मते, सुनील थोटे अध्यक्ष तुमसर शहर, मनोहर साठवणे, शिशुपाल गोपाले, निशांत बुरडे, मयूर पंचबुद्धे, गोलू अलोने, अतुल सार्व्हे, गोवर्धन निपाने, आमीन शेख, राकेश बनकर, योगेंद्र ब्राह्मणकर, धनु साखरे, बंडू चेटूले, स्नेहल मेश्राम, राहुल वाघमारे, प्रकाश दमाहे, विशाल भिवगडे, ओमप्रकाश चव्हाण, विवेक पागुरे, नरेश इलमकर, लंकेश मेहर, सुरेश बडगे, जितेंद्र बोन्द्रे, मधु अडमके, विकास राऊत, विषवजित थुलवकर, दामाजी शेंडे, चेतन माकडे, राकेश तांबुलकर, शुभम बागडे, सचिन उके, देवेंद्र शहारे, इशा खान, कैलास मते व मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.