३,२०० किलो मोहापास जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पोलिसांनी आज दिनांक २९ रोजी तिरोडा शहरातील अवैध दारू गाळणाºया ५ व्यावसायिकांवर कारवाई करीत अवैधरीत्या मोहफूलाची दारु गाळण्याकरिता ठेवलेला ३२०० किलो सडवा मोहापास जप्त करून नष्ट केला. तिरोडा ठाणेदार देविदास कठाळे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार संत रविदास वार्ड तिरोडा येथे दारू गाळण्याकरीताा सडवा मोहापास असल्याची माहिती मिळाली त्याआधारे उपपोलीस निरीक्षक चिरंजीव दलालवाड, विजयकुमार पुंडे महिला पोलीस उपनिरीक्षक दिव्या बरड ,पोलीस हवालदार संजीव बान्ते,योगेश कुळमते, तुरकर, कुत्राहे ,शिपाही शिवशंकर शेंडे,पटले, महिला पोलीस शिपाई बोपचे, यांनी संत रविदास वार्ड तिरोडा येथील संजय अशोक बरीयेकर यांचे कडे ३० प्लास्टिक पोतडीत प्रत्येकी ४० किलो प्रमाणे १२०० किलो सडवा मोहा पास किंमत ९६ हजार रुपये ,साबीर रहीम खा पठाण यांचेकडे दहा प्लास्टिक कोतडीत प्रत्येकी ४० किलो प्रमाणे ४०० किलो सडवा मोहापास किंमत ३२ हजार रुपये आशाबाई राजेंद्र भोंडेकर हिचे कडून दहा प्लॅस्टिक पोतडीत प्रत्येकी ४० किलो प्रमाणे ४०० किलो सडवा मोहापास किंमत ३२ हजार रुपये ,मायाबाई प्रकाश बरीयेकर हिचे कडे २० प्लास्टिक पोतडीत प्रत्येकी ४० किलो प्रमाणे ८०० किलो सडवा मोहापास किंमत ६४ हजार रुपये व मायाबाई श्यामराव झाडे हिच्याकडून दहा प्लास्टिक पोतडीतील प्रत्येकी ४०0 किलो प्रमाणे ४०० किलो सडवा मोहापास किंमत ३२ हजार रुपये असा पाचही लोकांकडून एकूण ८० प्लास्टिक पोतळीतील ३,२०० किलो सडवा मोहापास किंमत २ लक्ष ५६ हजार रुपयाचा सडवा मोहापासजप्त करून नष्ट करुन महाराष्ट्र पोलीस दारूबंदी कायद्यानुसार कारवाई केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *