शंभरातून दहा जणांना ‘आय फिव्हर’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी Ñगोंदिया : जिल्ह्यात पावसाळ्यात होणाºया डोळ्याचे आजाराने सध्या थैमान घातले आहे. शंभरातून किमान दहा जणांना हा आजार झाला आहे. डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेल्या काही दिवसांपासून या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेऊन उपाययोजना कराव्यात, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. डोळे हा मानवी शरीरातील सर्वात नाजूक व महत्वाचा अंग आहे. मात्र, पावसाळा हा संसर्ग काळ असल्यामुळे या काळात आय फ्ल्यू म्हणजेच डोळे येण्याचा आजार बळावतो. या आजारात डोळ्यातून सतत पाणी येते.

सूज राहत असून डोळ्याने स्पष्ट दिसू शकत नाही. डोळे आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यास या आजाराची लागण होते. डोळे आलेल्या संक्रमित व्यक्तीच्या डोळ्यातून येणाºया अश्रुच्या संपर्कात आल्यास संसर्ग वाढतो. याशिवाय संक्रमित व्यक्ती खोकल्याने किंवा शिंकल्याने देखील पसरु शकतो. जिल्ह्यात काही दिवसांपासून या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नेत्र रुग्णालयांमध्ये या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी रुग्णालयात गर्दी करीत आहेत. पीडित व्यक्तीने इतरांकडे पाहिल्यास हा आजार पसरतो, हा गैरसमज आहे. बॅक्टेरिया किंवा वायरससारख्या सुक्ष्म जीवाणूंची वाढ झाल्याने हा आजार होतो. शहरात या रुग्णांची संख्या वाढली आहे. या आजाराची लक्षणे दिसताच रुग्णांनी नेत्रतज्ञांकडून उपचार केल्यास धोका टाळता येतो, असे नेत्रतज्ञ डॉ. आभा सोनकिया यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *