पूरपरिस्थितीत नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी -जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : पावसाळा सुरु झालेला असून अशा परिस्थितीत पुरावा धोका संभावत असतो. जिवापेक्षा दुसरे काहीच महत्वाचे नाही, त्यामुळे पूरपरिस्थितीत नागरिकांनी आपल्या जिवाची विशेष काळजी घ्यावी व या दरम्यान कुठल्याही धोकादायक घटनेला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिका- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात २८ जून रोजी जिल्ह्यातील मान्सून व पूरपरिस्थिती बाबत पत्रकार परिषदेत माहिती देतांना ते बोलत होते. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन री चिन्मय गोतमारे यांनी केले. नदी किंवा नाल्याला पूर आला असल्यास तो ओलांडू नये असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. पावसाळ्यात रस्ते खचने, पूल वाहून जाणे, नाल्या चोक होणे अशा घटना घडत असतात. त्यामुळे वाहन चालवितांना विशेष काळजी घेण्यात यावी. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल येत असतो अशावेळी वाहनांची गती नियंत्रणात ठेवावी असेही ते चौबे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

नुकतेच जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून २७ जून रोजी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. या दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पिंपळगाव-अरततोंडी दरम्यान असलेल्या नाल्यावरील पुलावरुन वाहणाºया पुराच्या पाण्यातून अरविंद गणपत ठाकरे अंदाजे वय ५० वर्ष हा इसम वाहून गेला असून आज दि.२८ जून रोजी जिल्हा शोध व बचाव म्हणाले. पथकाद्वारे वाहून गेलेल्या इसमाचे प्रेत बाहेरकाढण्यात आले आहे. तसेच २८ जून रोजी तिरोडा तालुक्यातील सरांडी येथे विहिरीत ४ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटना विहिरीत लावलेल्या मोटरपंप काढण्यासाठी गेले असता विद्युत करंट लागून किंवा विषारी वायूने झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. सदर ४ लोकांच्या मृत्यूचे ठळक कारणे शवविच्छेदन आल्यानंतरच निष्पन्न होईल अशी माहिती जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी पत्रकार पूरपरिस्थितीत नदी-नाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत असतांना कोणतेही वाहन ओलांडू नये शिवाय पायीसुध्दा जाण्याचा प्रयत्न करु नये. सेल्फी घेण्यासाठी मुलांना नदी-नाल्यांच्या पाण्याजवळ जाऊ देऊ नये. शक्यतो विजेच्या उपकरणांचा वापर करु नये.  पूरपरिस्थिती दरम्यान स्थलांतर करावे लागल्यास आवश्यक वस्तु बरोबर घ्याव्यात व सुरक्षित रस्त्यांचाच वापर करावा. आपत्ती प्रसंगी नजिकच्या तहसिल परिषदेत दिली. कार्यालय, पोलीस स्टेशन अथवा बचावदलाशी संपर्क साधावा. जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी मिळणाºया सूचनांचे पालन करावे, असेही जिल्हाधिकाºयांनी यावेळी सांगितले.

पुर परिस्थीतीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज…

पूर परिस्थितीवर मात करणे शक्य आहे. आपत्ती दरम्यान नागरिकांच्या कोणत्याही मदतीसाठी जिल्हा प्रशासन नेहमीच सज्ज आहे. प्रशासन व नागरिक हे समाजातील घटकाचे दोन बाजू आहेत, अशा परिस्थितीत आपत्ती दरम्यान प्रशासन व नागरिकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्रित यावे. सद्यस्थितीत धरण, जलाशय इत्यादींमध्ये पाण्याची पातळी वाढत असून पाण्याचा विसर्गामुळे नदी काठावरील गावांमध्ये संभाव्य पूर परिस्थितीचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सर्व संबंधित नागरिकांनी विशेष दक्षता घेवून “सजग नागरिक सुरक्षित नागरिक” या सूत्राचे पालन करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सहकार्य करावे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष- ०७१८२-२३०१९६, ९४०४९९१५९९ (वाट्सअ‍ॅप) या क्रमांकावर संपर्क करावे.

जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन…

सद्यस्थितीत धरण, जलाशय, तलाव, नदी, नाले इत्यादींमध्ये पाण्याची पातळी वाढली असून अशा ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात उतरू नये. तसेच या ठिकाणी सेल्फीचे मोह टाळावे व पाण्यात बोटिंग करतांना लाइफ जॅकेटचा वापर करावा तसेच बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त नागरिकांनी बसू नये. तसेच पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, पाण्यात वाहन टाकू नये. ढगाळ वातावरण किंवा मेघ गर्जना होत असल्यास सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. धातुजन्य वस्तुच्या जवळ उभे राहू नये. या दरम्यान विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *