जिल्ह्यातील ४५ आरोग्य संस्थांना कायाकल्प योजनेतंर्गत ४० लाख रुपयांचे पुरस्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : आरोग्य संस्थामधील सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या कायाकल्प योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४५आरोग्य संस्थांना वर्ष २०२१-२२ वर्षातील कामगिरी केल्याबद्दल ४० लाख रुपयांचे कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला असल्याचे माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आरोग्य संस्थांचा कायापालाट होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करुन सर्व आरोग्य कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे.इतरही आरोग्य संस्थेने स्पर्धेत उतरुन गुणवत्ता वाढवुन उत्तम आरोग्य सेवा लोकांना देण्याचे आवाहन त्यांनी ह्याप्रसंगी केले. रुग्णालयातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण व वैद्यकिय सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी २०१५ वषार्पासुन कायाकल्प पुरस्कार योजना सुरू केली असून या पुरस्काराकरिता रुग्णालयांची आतील व बाह्य परिसर स्वच्छता, निजंर्तुकीकरण,बेड स्वच्छता, उपलब्ध साधनांचा वापर ,योग्य आय.ई.सी लावणे, प्रसूतीगृहाचा वापर व स्वच्छता, प्रयोगशाळा बळकटीकरण व स्वच्छता, अधिकारी व कर्मचाºयांची कार्यक्षमता, रुग्णांना देण्यात येणाºया विविध सेवा,लोकसहभागातुन कार्यक्रम राबविणे,नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर,

जैविक घनकचºयाचे व्यवस्थापन व त्यांची विल्हेवाट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाणी बचत व सांडपाण्याचा निचरा, कर्मचाºयांचे रुग्णासोबत वर्तणुक, रुग्णांचे मनोगत आदि प्रत्येक बाबीसाठी गुण असून या निकषांवर पुरस्कार जाहीर केले जात असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी या वेळी दिली. . आय.एस.ओ. मानांकनाच्या धर्तीवरील या पुरस्कारासाठी आरोग्य संस्थेतील अधिकारी व कर्मचारी सुविधा उपलब्ध करून स्वत: तपासणी करून प्रस्ताव सादर करतात त्यानुसार जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समितीकडून तपासणी केली जाते व 70% पेक्षा जास्त गुण मिळवणाºया संस्थांना प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असल्याची माहीती जिल्हा गुणवत्ता समन्वयक डॉ. पंकज पटले यांनी या वेळी दिली. राज्यस्तरीय पुरस्कारांपैकी नागपूर विभागातून उत्तम दजार्चा रुग्णसेवेसाठीचा पर्यावरण स्नेही रुग्णालय मानांकन उपजिल्हा रुग्णालय तिरोडाला रु 5 लाखाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे..

जिह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांना सुद्धा मानांकन देवुन पुरस्कार देण्यात आला आहे. जिल्ह्यातुन उपजिल्हा रुग्णालय श्रेणीतुन उपजिल्हा रुग्णालय तिरोडाला परत १५ लाख तर प्रोत्साहनपर ग्रामीण रुग्णालय आमगाव , ग्रा.रु.रजेगाव, ग्रा.रु .गोरेगाव, ग्रा.रु. नवेगाव बांध, ग्रा.रु. अजुर्नी मोरगाव यांना प्रत्येकी रु.एक लाख पुरस्कार करिता निवड झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरासाठीचा प्रथम मानांकन पुरस्कार सडक अर्जूनी तालुक्यातील ड्व्वा प्राथमिक आरोग्य केंद्राला रु दोन लाख तर प्रोत्साहनपर खालील ११ प्राथमिक आरोग्य केंद्र यांना प्रत्येकी रु.५० ह्जार पुरस्कार करिता निवड झाली आहे.त्यात गोंदिया तालुक्यातील भांनपूर व एकोडी . आमगाव तालुक्यातील ठाणा ,गोरेगाव तालुक्यातील सोनी व चोपा, देवरी तालुक्यातील ककोडी ,अजुर्नी मोरगाव तालुक्यातील केशोरी व कोरंभीटोला , सडक अजुर्नी तालुक्यातील खोडशिवनी ,सालेकसा तालुक्यातील कावराबांध, तिरोडा तालुक्यातील ईंदोरा यांचा समावेश आहे. आरोग्यवर्धिनी उपकेंद्र स्तरासाठी दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील तेढवा उपकेंद्राला रु. एक लाखासाठीचा प्रथम पुरस्कार तर लहीटोला उपकेंद्राला रु.५० हजार साठीचा द्वितीय पुरस्कार साठी निवड झाली असुन खालील २४ उपकेंद्राना प्रोत्साहनपर रु.२५ ह्जार पुरस्कार करिता निवड झाली आहे.पुढिलप्रमाणे तालुकानिहाय उपकेंद्र गोंदिया तालुक्यातील १३ उपकेंद्र त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र भानपुर अंतर्गत उपकेंद्र कुड्वा,मुंडीपार व ढाकणी, प्राथमिक आरोग्य केंद्र दासगाव अंतर्गत उपकेंद्र पांढराबोडी व डांगोर्ली,

प्राथमिक आरोग्य केंद्र मोरवाही अंतर्गत दतोरा व बटाणा, प्राथमिक आरोग्य केंद्र रावणवाडी अंतर्गत उपकेंद्र कंटगीकला व नागरा, प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी अंतर्गत उपकेंद्र कांरजा, प्राथमिक आरोग्य केंद्र काटी अंतर्गत उपकेंद्र कोरणी , प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी अंतर्गत उपकेंद्र गंगाझरी, आमगाव तालुक्यातील ३ उपकेंद्र त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र कालीमाटी अंतर्गत उपकेंद्र कातुर्ली व गिरोला, प्राथमिक आरोग्य केंद्र बनगाव अंतर्गत उपकेंद्र पदमपुर. सडक अजुर्नी तालुक्यातील २ उपकेंद्र त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा अंतर्गत उपकेंद्र खजरी , प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनी अंतर्गत उपकेंद्र बोपाबोडी. गोरेगाव तालुक्यातील २ उपकेंद्र त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडा अंतर्गत उपकेंद्र कवलेवाडा , प्राथमिक आरोग्य केंद्र कुहार्डी अंतर्गत उपकेंद्र कटंगी . तिरोडा तालुक्यातील २ उपकेंद्र त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडीकोटा अंतर्गत उपकेंद्र पांजरा व केसलवाडा. देवरी तालुक्यातील १ उपकेंद्र त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला अंतर्गत उपकेंद्र पिंडकेपारअजुर्नी मोरगाव तालुक्यातील उपकेंद्र त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र चानाबाकटी अंतर्गत उपकेंद्र निमगाव. पुरस्कार प्राप्त करण्यासाठी सर्व वैद्यकिय अधिकारी , सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक , आरोग्य सहाय्यिका , आरोग्य सेवक , आरोग्य सेविका, आशा सेविका, परिचर , स्वछक यांनी मेहनत घेतली त्यासर्वांचे काम अभिनंदनास पात्र असल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी म्हटले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *