दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील राइस मिलची चाके थांबली!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : केंद्र सरकारने उष्णा तांदळ- ावर २० टक्के निर्यात शुल्क तर अरवा तांदळाच्या निर्यातीवर २३ आॅगस्टपासून बंदी घातली आहे. तांदळाची निर्यात थांबल्याने २३ सप्टेंबरपासून पूर्व विदभार्तील ६७५ मिल बंद पडल्या असून यावरून अवलंबून असणाºया ५० हजारांपेक्षा जास्त मजुरांचा रोजगारसुद्धा हिरावला आहे. मागील दोन महिन्यांपासून शासनाने यावर कसलाच तोडगा न काढल्याने राइस मिल उद्योग डबघाईस आला असून हीच स्थिती राहिल्यास याचा शेतकºयांनासुध्दा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्व विदर्भात धानाचे उत्पादन सर्वाधिक घेतल्या जाते. त्यामुळे यावर आधारित राइस मिल उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. या उद्योगातून ६० हजारावर मजुरांना रोजगार मिळतो. तर पूर्व विदर्भातून मोठ्या प्रमाणात चांगल्या तांदळाची विदेशात निर्यात केली जाते.

यात उष्णा तांदूळ (बायल राइस) अरवा तांदूळ (साधा तांदूळ) मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. पूर्व विदर्भात ६७५ राइस मिल असून यातून धानाची भरडाई करून तो देशविदेशात पाठविला जातो. यामुळे धानालासुद्धा चांगला दर मिळण्यास मदत होते. पण केंद्र सरकारने २३ आॅगस्टपासून अरवा तांदळावर निर्यात बंदी तर उष्णा तांदळावर २० टक्केनिर्यात शुल्क केले. परिणामी तांदळाची निर्यात थांबली आहे. परिणामी १५ सप्टेंबरपासून धान भरडाई बंद आहे. निर्यात शुल्क रद्द करून तांदळाच्या नियार्तीवरील बंदी हटविण्याची मागणी विदर्भ राइस मिल असोसिएशन केंद्र व राज्य सरकारकडे केली होती. पण त्यांनी मागील दोन महिन्यांपासून यावर कुठलाही तोडगा न काढल्याने पूर्व विदर्भातील राइस मिलची चाके थांबली आहेत. परिणामी यावर अवलंबून असणार ६० हजारांवर मजुरांचा रोजगार सुद्धा हिरावला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.