बालचित्रकाराने नानाभाऊंना दिले पेंटिंग केलेले चित्रभेट

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : येथील सुभाष वार्डातील रहिवासी १५ वर्षीय सुमित रामचंद्र निमजे या विद्यार्थ्यांने ६० वर्षीय असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना फाल्गुन पटोले यांच्या छायाचित्र पाहून हुबेहूब पेंटिंग काढून एक आगळी वेगळी भेट देऊन स्वत:ची ओळख निर्माण केली. आपल्या आयुष्यात कला महत्त्वाच्या, कारण आयुष्यात कला नसेल तर सर्जनशीलतेचा झराच आटल्यासारखा होईल आणि म्हणूनच लहानपणापासूनच मुलांमधील कला जोपासायला हव्यात. मुलांच्या वाढीत चित्रकलेचाही अमूल्य वाटा आहे. अगदी १५ वर्षाच्या विद्यार्थ्याला देखील रेघोटयांच्या स्वरूपात चित्र काढण्याच्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. कलेचे आयुष्यातले महत्त्व समजून घेताना अनेक प्रश्न पडने साहजिक आहे. शाब्दिक, भाषिक संवादाच्याही आधी मूल अनेकदा चित्रातून संवाद साधत असते आणि संवाद हे माध्यम मग आयुष्यातल्या अनेक गोष्टींना जोडते. असाच मोहाडी येथील सुभाष वार्डातील स्व.यशवंत निमजे यांच्या नातू सुमित निमजे याने विविध स्पर्धेत भाग घेऊन चित्रकार म्हणून ओळख निर्माण केली आहे. अंगणवाडी सेविका अंजू पराते, इयत्ता १ ते ४ पर्यंत जि.प.बूनियादी प्राथमिक शाळा मोहाडी येथे नलीनी पडोळे, इयत्ता ५ ते ७ प्रल्हाद मोहतुरे, इयत्ता ९ते १० वी भाऊराव सेलोकर, इयत्ता ११ वी सेलोकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

कोरोना काळात घरी राहत असल्याने कागदावर पेंटिंग कामे करण्याचा उपक्रम सुरू केला. महाराष्ट्र शासन नगरपंचायत मोहाडीच्या वतीने आजादी का अमृत महोत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सैनिकाच्या चित्र काढून त्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम नगराध्यक्ष छाया डेकाटे, उपाध्यक्ष शैलेश गभने यांच्या सहीनिशी प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथे परीक्षा पे चर्चा २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या स्वच्छ भारत चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. हिंदवी प्रतिष्ठान भंडारा २४ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जीवन चरीत्रावरील चित्रकला स्पर्धेत उत्स्फुर्त सहभाग घेतल्याबद्दल संरक्षक नरेंद्र भोडेकर, स्पर्धा प्रमुख संयोजक प्रकाश पांडे, संयोजक अरुण भेदे, संस्थापक अध्यक्ष जैकी रावलानी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आई शोभा रामचंद्र निमजे, काकू उर्मिला चंद्रशेखर निमजे, भूमिका धनराज निमजे, काका रविशंकर निमजे, तुषार चंद्रशेखर निमजे, दीपक चंद्रशेखर निमजे, आस्था धनराज निमजे, हिनेशा धनराज निमजे, चेतन धनराज निमजे यांचे सहकार्य लाभत आहे.

सुदामा कनिष्ठ महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या पानटपरी दुकानदार काका रविशंकर निमजे याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे छायाचित्र देऊन फोटो पेंटिंग करायला सांगितले. सदर पेंटिंग त्याने दोन दिवसात तयार करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी साकोली तालुक्यातील सुकळी येथे निवासस्थानी जाऊन रविवार दि.१२ नोव्हेंबर २०२३ ला सायंकाळी ७.३० वाजता पत्नी मंगला पटोले, मुलगा राहुल पटोले, मुलगी प्रिया पटोले, आई मीरा फाल्गुन पटोले यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निवासस्थानी नरकचतुर्थी व लक्ष्मीपूजनाचे औचित्यसाधून मोहाडी येथील सुभाषवार्डतील रहिवासी जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथील इयत्ता ११ वी अमधील सुमित रामचंद्र निमजे या विद्यार्थ्यांनी नाना पटोलेच्या पेंटिंग केलेला फोटो दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे, एबीपी माज्याचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत देशाई, लोकशाहीचे जिल्हा प्रतिनिधी सरवर शेख, आदर्श बडवाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सप्रेम भेट दिला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.