ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक द्या : जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : ज्येष्ठ नागरिक आपल्या समाजाचा आधार स्तंभ आहेत. त्यांचे अनुभव व कार्य नव्या पिढीला नेहमीच प्रेरणादायी असते. ज्येष्ठ नागरिक शासकीय कार्यालये, बँक, रुग्णालय व खासगी आस्थापणेत आल्यास त्यांचे काम प्राधान्याने करावे व सन्मानाची वागणूक द्यावी. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या शासकीय योजनांचा त्यांना प्राधान्याने लाभ द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ज्येष्ठ नागरिक समितीची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या. सहायक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौणिकर, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत तुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. बी. सुतार, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहायक प्रकल्प अधिकारी श्रीमती आर. पी. मिश्रा, प्रशासकीय अधिकारी जिल्हा परिषद सी. ए. राणे, अशासकीय सदस्य लीचंद बुध्दे व ज्येष्ठ नागरिक संघ प्रतिनिधी नारायणप्रसाद जमईवार बैठकीस उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक आपल्या कामासाठी शासकीय कार्यालय, रुग्णालय, बँक व विविध आस्थापणेत जात असताना या ठिकाणी त्यांचा पिण्याच्या पाण्याची सोय, बसण्याची व्यवस्था प्राधान्याने करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी केल्या. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक येत असतात अशा ठिकाणी त्यांच्यासाठी वेगळी रांग असावी याकडे लक्ष द्यावे. केंद्र सरकारच्या आयुष्यमान भरात योजनेचे कार्ड तयार करण्यासाठी विशेष मोहिम घेण्यात यावी.

वृद्ध कलाकारांचे मानधन वेळेत देण्याचे नियोजन करण्यात यावे. ग्रामपंचायतमध्ये असलेल्या समाज भवनात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याचा प्रयत्न करावा. रुग्णालयात उपचारासाठी ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. मोठ्या शहरात एकाकी राहणाºया ज्येष्ठ नागरिकांना हेरून त्यांच्यावर हल्ला होण्याच्या घटना घडत असतात. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचा विविध स्तरातून होणारा छळ, पिळवणूक यापासून त्यांचे संरक्षण करण्यात यावे. पोलिसांनी ज्येष्ठांची सुरक्षितता व अन्य प्रश्न यामध्ये जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्यासाठी जागरूकता दाखवावी. त्याचप्रमाणे पोलीस ठाण्यात त्यांच्या हद्दीत राहणाºया ज्येष्ठ नागरिकांची विशेषत: एकाकी राहणाºया ज्येष्ठ नागरिकांची अद्ययावत यादी ठेवण्यात यावी असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वृद्धांसाठी असणाºया सर्व योजना एकाच छत्राखाली आणून लाभ देण्याचे नियोजन करावे. आरोग्य विभागाने सुद्धा या प्रकारे योजनांचा लाभ देण्यासाठी व्यवस्था निर्माण करावी. सर्व शासकीय कार्यालयांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी असे त्यांनी सांगितले. १ आॅक्टोबर रोजीच्या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.