ओबीसी संघटना भीक मागणार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : शासनाने राज्यासह गोंदिया जिल्ह्यात दोन वसतीगृहांना मान्यता दिली. मात्र वित्त विभागाने निधी उपलब्ध केला नसल्याने वसतीगृह सुरु होण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत. वसती गृहाची समस्या आठवडाभरात निकाली न काढल्यास ओबीसी संघटनाच्यावतीने जिल्ह्यासह राज्यात येत्या १२ सप्टेंबरला भीक मांगो आंदोलन करण्यात येणार आहे. यातुन संकलीत रक्कम शासनाच्या वित्त विभागाला निधी पाठवण्यात येणार असल्याचे ओबीसी अधिकार मंच व इतर ओबीसी संघटनाच्यावतीने आज ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बहुजन कल्याण मंत्री यांना पाठविलेल्या निवेदण्यात म्हटले आहे. राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी समाज शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या आजही मागासलेला आहे. या प्रवर्गातिल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात राहावे लागते. या शहरांमध्ये शासकीय सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने आर्थिक विवंचनेत अनेकदा या विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. असे होऊ नये म्हणून फेब्रुवारी २०२३ मध्ये राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन वसतीगृह सुरू करण्यास मान्यता दिली. मात्र वसतीगृहांच्या संचालनासाठी वित्त विभागाने अद्यापही निधी न दिल्याने वरील प्रवगार्ती विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आधार योजनेलाही वित्त विभागाची मान्यता मिळाली नाही. परदेशी शिष्यवृत्ती योजनेत संख्या वाढविण्यासाठी वित्त विभागाने मान्यता दिली नाही.

वित्त मंत्रालयाकडून ओबीसी विद्यार्थ्यांच्या योजनेत सातत्याने खोडा घातला जात आहे. ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांच्या फाईल्स अडवल्या जात आहेत. काही फाईल्सवर नकारात्मक शेरा दिला जात असल्याचे ओबीसी संघटनांचे म्हणने आहे. भेदभावपुर्ण धोरणविरूद्ध विविध ओबीसी संघटना एकवटल्या आहेत. ११ सप्टेंबरपर्यंत धोरणात्मक निर्णय न झाल्यास वरील प्रवर्गाती विद्यार्थ्यांसाठी शासनाकडे निधीची कमी आहे, असे समजून १२ सप्टेंबर रोजी गोंदियासह राज्यातीसर्व जिल्ह्यामध्ये भीक मांगो सत्याग्रह करून संकलीत रक्कम शासनाला मनीआॅर्डर केली जाणार असल्याचे संघटनांच्या प्रतिनिधीनी शासनाला पाठविलेल्या निवेदण्यात नमूद केले आहे. निवेदन देतेवेळी ओबीसी अधिकार मंचचे सयोंजक खेमेंद्र कटरे, अशोक लंजे, ओबीसी संघर्ष समितीचे कैलास भेलावे, सविता बेदरकर, अतुल सतदेवे, सुनिल भोगांडे, शिशिर कटरे, चंद्रभान तरोणे, संतोष भेलावे, स्वानंद पारधी, जि. प. सदस्य पवन पटले, मिलिंद समरीत, हरीष मोटघरे, रवी सपाटे, सावन डोये, निखिल गजभिये, लिलाजी डहारे, प्रेमलाल गायधने, मुकेश भांडारकर, टेकराम बिसेन, प्रेमलाल साठवणे आदीसह ओबीसी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *