बेला येथे काँगे्रसच्या जनसंवाद पदयात्रेला उदंड प्रतिसाद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील येड्यांचे (एऊअ ) सरकार जनतेचे लूट करत आहे. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, महिला तरुण कामगार असे सर्वच समाजघटक या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्याच्या विविध भागातील खरिपाचे पीक वाया गेल्याने शेतकरी उध्वस्तझाला आहे. पण सरकारकडून कोणताही दिलासा मिळत नाही त्यामुळे राज्यातील जनता हवालदिल झालेली आहे. या जनतेशी संवाद साधण्यासाठी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी व त्यांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने दि.३ सप्टेंबर पासुन संपुर्ण महाराष्ट्र राज्यात राज्यव्यापी जनसंवाद पदयात्रेलासुरुवात करण्यात आली आहे. त्याअंतर्गत भंडारा तालुका काँग्रेसच्या वतीने दि.३ सप्टेंबर रोजी भंडारा तालुक्यातील ग्राम चिखली इथुन जनसंवाद पदयात्रेला सुरूवात करण्यात आली.आज पदयात्रेच्या दुसºया दिवशी दि.४ सप्टेंबर रोजी ग्राम बेला इथुन जनसंवाद पदयात्रेला सुरूवात करण्यात आली.

यावेळी ग्राम बेला येथे पदयात्रेला उदंड असा प्रतिसाद दिसुन आला.कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बेलायेथील नागरीकांशी संवाद साधत केंद्रातील भाजप व राज्यातील ईडी सरकारच्या जुलमी,हुकुमशाही व चुकीच्या धोरणांचा पाढा नागरीकांपुढे वाचला.यावेळी नागरीकांमध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विरोधात तीव्र असंतोष दिसुन आला. शेकडो कार्यकर्त्यांनी नागरीकांशी संवाद साधत काँग्रेस पक्षाचे पत्रकाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच पुजा ठवकर व धनराज साठवने यांनी संबोधीत करतांना मोदी सरकारला हद्दपार करण्याचे आवाहन केले. यात्रेत काँग्रेस तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे,प्रेमसागर गणवीर ,माजी सरपंच पुजा ठवकर, धनराज साठवणे, गायत्री वाघमारे ,स्वाती हेडाऊ ,प्रेम वनवे ,पवन वंजारी ,विनीत देशपांडे ,राजकपूर राऊत, पवन मस्के, देवराम बोरकर, गोवर्धन बोरकर ,भास्कर गजभिये, अरुण गोंडाने, निखिल इलमे, सोपान आजबले, पराग वघरे, सुनील बोरकर, राजू गोमासे, राजेंद्र नागनावरे, उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *