अखेर हत्ती च्या कळपाचे पलायन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोर तालुक्यात धुमाकूळ घालणाºयाचा हत्तीच्या कळपासून अखेरीस दूर अंतरावर पलायन केले आहे. जिल्हा सिमेपासून ३५ ते ४० किमी दूर अंतरावर गडचिरोली जिल्ह्यात हत्तीचे कळप गेल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. मागील महिन्यात हत्तीचा कळप छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाल्यावर जिल्ह्यातील अर्जुनी मोर तालुक्यात पोहोचला. या तालुक्यातील नवेगावबांध वनपरिक्षेत्रातील कवठा जंगल परिसरात त्यांनी आपले बस्तान मांडले. यावेळी परिसरातील शेकडो एकर शेतपिकाचे त्यांनी नुकसान केले. यादरम्यान हत्तीच्या हल्ल्यात एका नागरिकाला जीवही गमवावा लागला. दरम्यान हत्तीच्या गळपाने नागनडोह परिसरात तब्बल १५ दिवस धुमाकूळ घातला. शेतपिकांसह गावातील नागरिकांच्याघराचे व साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे अर्जुनी मोर तालुक्यातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातवरण होते. मात्र दिवाळी होताच हत्तीच्या कळपाने गडचिरोलीकडे पलायन केले असून जिल्हा सिमेपासून जवळपास ४० किमी अंतरावर दूर गेल्याने नागरिकांसह वनविभागालाही दिलासा मिळाला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *