व्यापाºयांचे गोदाम ‘फुल्ल’ झाल्यानंतर धान खरेदी केंद्र सुरु होणार?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोर : तालुक्यात बहुतांशी शेतकºयांची धानाची मळणी आटोपलेल्यात जमा आहे. मात्र अजुनपर्यंत हमी भाव धान खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त असून धान खरेदी करणाºया व्यापाºयांचे गोदाम ‘फुल्ल’ झाल्यानंतर हमी भाव धान खरेदी केंद्र सुरु करणार काय? असा संतप्त प्रश्न शेतकरी विचारीत आहेत. अर्जुनी मोर तालुका धान उत्पादनाच्या बाबतीत जिल्ह्यात अग्रेसर आहे. खरीप आणी रब्बी हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेत असतो. या तालुक्यातील नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेता हलक्या प्रजातीचे धान हे दिवाळी पूर्वी किंवा दिवाळीनंतर निघते. तर त्यानंतर महिणाभरानंतर भारी प्रजातीचे धान उत्पादन मिळते. परंतु दिवाळी संपून एक महिण्याचा कालावधी होऊन सुध्दा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे व आदिवासी महामंडळाचे हमीभाव धान खरेदी केंद्र अजुनपर्यंत सुरु झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी महामंडळ व मार्केटिंग फेडरेशन तसेच शासनावर तिव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे, सध्या तालुक्यात रानटी हत्ती व जंगली हिंस्त्र पशुंचा मोठा उपद्रव चालू आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी प्रचंड दहशतीखाली आहेत. मिळेल त्या साधनांनी धानाची मळणी करण्याचे काम युध्दस्तरावर सुरु आहे. मात्र शासनस्तरावरुन हमी भाव धान खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

तालुक्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे दि.तालुका शेतकी खरेदी विक्री समिती ही सबएजेंट म्हणून तालुक्यात आठ ते दहा केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी करते. तर आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी संस्था तथा लक्ष्मी राईस मिल तसेच अनेक विविध कार्यकारी संस्था हमी भाव धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी करतात. मात्र, आदिवासी विविध कार्यकारी संस्थांनी धान खरेदीचे जुने कमिशन द्या, नंतरच धान खरेदी करु, असा इशारा आदिवासी महामंडळ व शासनाला दिला आहे. त्यामुळे धान खरेदीचा तिढा सुटलेला नाही. तसेच मार्केटिंग फेडरेशनने अजुनपर्यंत बारदाना पाठविला नाही. सोबतच ४० क्विंटल धान खरेदी संदर्भात अद्याप तोडगा निघाला नसल्याने सर्वच केंद्रातील धान खरेदी रेंगाळली आहे. शासन, लोकप्रतिनिधी, आदिवासी महामंडळ व मार्केटिंग फेडरेशन यांनी त्वरीत यावर तोडगा काढून हमी भाव धान खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी धाबेटेकडी/आदर्श येथील शेतकरी बंडूभाऊ सोनवाने यांच्यासह शेकडो शेतकºयांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *