चारचाकी वाहनाला अपघात

लाखांदूर : लाखांदूर येथील कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या खासगी चारचाकी वाहनांचे समोरील डाव्या बाजूचे टायर फुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर धडक दिली. यात चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले असून चारचाकी वाहनात बसलेल्या दोन मुले जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. लाखांदूर येथील कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती कोकाटे हे आपल्या मुलांसह चारचाकी वाहनाने आज दुपारी ३ वाजे च्या सुमारास लाखांदूर वडसा या मुख्य मार्गावरून जात असताना राजेंद्र ट्रेडर्स यांच्या दुकानासमोर समोरील डाव्या बाजूचा टायर फुटल्याने अपघात झाला . या अपघातात न्याय. पूजा कोकाटे यांची दोन्ही मुलं किरकोळ जखमी झाले असून पुढील उपचारासाठी त्यांना ब्रम्हपुरी येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे हे आपल्या सहकाºयांसह घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला.या अपघातात राजेंद्र ट्रेडर्स चे राजेंद्र खत्री यांच्या ट्रक ची नुकसान झाली आहे.पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *