नागडडोह येथे रानटी हत्तींचा धुमाकूळ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जंगल परिसरातील रानटी हत्तींचा मुक्काम असुन बुधवारी रात्रीच्या सुमारास केशोरीपासुन १२ कि.मी. अंतरावरील नागणडोह येथे हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घालुन झोपड्यांचे व नागरिकांच्या सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल सुदैवाने यात कुठलीही जीवीतहानी झाली नाही. या घटनेमुळे वस्तीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागणडोह येथे ३० ते ३५ नागरिकांना तिडका येथे सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार रानटी हत्तींच्या कळप बुधवारी उमरपायली जंगलाच्या दिशेने गेल्याचे गावकयांनी पाहिले. दरम्यान रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने नागणडोह येथील वस्तीत धुमाकुळ घातला. ठिकाणी दहा पंधरा घरांची वस्ती असुन ३० ते ३५ जण झोपड्या बांधुन राहतात. दरम्यान रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने हल्ला करून झोपड्यांची नासधुस केली. काही झोपड्यांच्या भिंती देखील पडल्या. तर घरातील जिवनावश्यक वस्तुंचे नुकसान केले. ही घटना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे या वस्तीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान गुरूवारी व या घटनेची माहिती या वस्तीतील लोकांनी वनविभागाच्या अधिका-यांना दिली. माहिती मिळताच गोठणगाव वनविभागाचे पथक, आरआरटी पथक आणि पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी पोहचुन मदत कार्याला सुरूवात केली. वस्तीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून येथील नागरिकांना बोरटोला येथे हलविण्यात आले आहे. हत्तीचे या परिसरात वास्तव्य असे पर्यंत या नागरिकांची बोरटोला येथे शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे वनविभागाच्या अधिका-यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *