अवैध गौणखजिन उत्तखनन प्रकरणी २.१५ कोटीचे साहित्य जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : दवनीवाडा हद्दीतील साईटोला घाट वैनगंगा नदीपात्र परिसरात ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धाड टाकून अवैध गौणखजिन उत्तखनन प्रकरणी २ कोटी १५ लाख ६० हजार रुपयांची मालमत्ता जप्त केली. या कारवाईत पोलिसांनी १० जणांवर गुन्हा दाखल केला असून ६ जणांना अटक केली आहे. वैनगंगा नदीच्या साईटोला घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैधरित्या उत्खनन होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास साईटोला घाटावर धाड टाकली. यावेळी नदीपात्रातून १० जण २ पोकलैंड मशीनद्वारे वाळूचे अवैधरित्या उत्खनन करुन ४ दहाचाकी टीप्परमध्ये वाहतुकीसाठी वाळू टाकत असल्याचे आढळून आले.ोलिसांनी या कारवाईत टिप्पर क्र. एमएच ३५, एएच१४९९ चा चालक अमर बारबुदे (३१) रा.दांडेगांव/ एकोडी, टिप्पर क्र. एमएच ३५, एजे ५६९९ चा चालक महेश शहारे (३५) रा. निलागोंदी, टिप्पर क्र. एमएच35, एजे ७२९९ चस चालक रामेश्वर सरीयाम (३६) रा. नवेगांव, टिप्पर क्र. एमएच ३५, एजे २९०६ चा चालक दिनेश चौधरी (४९) रा. नवेगाव यांना हे अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून वाहतूक करतांना मिळून आले. तसेच पोकलैंड मशीनद्ववारे रेतीचे उत्खनन करतांना पोकलैंड मशीन चालक यशवंत सोनवाणे (३५) रा. तिरोडा व रवींद्र शहारे (२६) रा. लोहारा मिळून आल्याने त्यांना पोकलैंड मशीनसह ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी एकूण १०जणांवर भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा दाखल केला असून २ पोकलँड मशिन, महामहिम दहाचाकी टिप्पर व २० ब्रॉस रेती असा एकूण २ कोटी १५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी देवळेकर यांच्या नेतृत्वात विशेष पोलीस पथकाचे पोलिस उपनिरीक्ष्ाक मंगेश वानखेडे, पोलिस अंमलदार सुजित हलमारे, महेश मेहर, पोना शैलेषकुमार निनावे, पोशि सन्नी चौरसिया, दया घरत यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *