१६ लक्ष ७७ हजाराचा सडवा मोहापास केला नष्ट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : पोलीस ठाणे तिरोडा येथील पोलीस निरीक्षक कठाळे यांचे नेतृत्वात १४ जून रोजी तिरोडा शहरातील संत रविदास वार्डातील ११ मोह फुलाची दारू गाळून विकणा-या विरुद्ध टाकलेल्या धाडीत तब्बल १६ लक्ष ७७ हजार रुपयाचा सडवा मोहापास जप्त करून नष्ट केल्याने अवैध दारु विक्रेत्यांना धडकी भरली आहे.

पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून त्यांनी दिनांक १४ जून रोजी आपले अधिनस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जोगदंड, हवालदार श्रीराम टेंभरे, नीलकंठ रक्क्षे, देविदास तुरकर, पंकज सव्वालाखे, मोहन भोयर, भूमेश्वर मेश्राम, शिपाई अमित गायकवाड, चेतन भैसारे, प्रकाश चवळे, सौरभ देवगडे, अविनाश लोंढे, महेंद्र अंबादे, ठाकरे, महिला शिपाई नैना माहुले, भूमेश्वरी तिराले यांचे सह संत रविदास वार्ड तिरोडा येथील संजय बरीयेकर यांचे कडून ७० पोतडी सडवा मोहापास किंमत २ लक्ष ८० हजार रुपये, अनिल कुवरलाल बिझांडे याचे कडून ३५ पोतडी सडवा मोहापास १ लक्ष ५ हजार रुपये, धमेद्र कुवरलाल बिझांडे यांचे कडून १५ पोतडी सडवा मोहापास ६० हजार रुपये, श्यामराव श्रीरामबिंझाडे यांचे कडून ९० पोतडी सडवा मोहापास २ लक्ष ७० हजार रुपये, दिलीप घनश्याम बरीयेकर याचे कडून ८४ पोतडी सडवा मोहापास ३ लक्ष ३६ रुपये, शाबिर रहीम खान पठाण हिचे कडून ५० पोतडी सडवा मोहापास १ लक्ष ५० हजार रुपये, चंद्रशिला श्रावण कनोजे हिचे कडून ९ पोतडी सडवा मोहापास ३६ हजार रुपये, सपना संजय बरीयेकर हिचे कडून २० पोतडी सडवा मोहापास ८० हजार रुपये, शिलाबाई विनोद खरोले हिचे कडून २० पोतडी सडवा मोहापास ८० हजार रुपये, अलिम गफूर खा पठाण याचे कडून ४० पोतडी सडवा मोहापास १ लक्ष ६० हजार रुपये व तौरीफ सलीम खान पठाण याचे कडून ३० पोतडी सडवा मोहापास १ लक्ष २० हजार असा एकूण १६ लक्ष ७७ हजार रुपयाचा अवैध दारू गाळणे करता ठेवलेला माल जप्त करून नष्ट केला.

सदर प्रकरणी महाराष्ट्र दारू बंदी कायदा अंतर्गत कारवाई केली असून या कार्यवाहीमुळे तिरोडा तालुक्यातील याबद्दल दारू गाळून विक्री करणा-यांना धडकी भरली आहे

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *