शाळेचे पहिल्या दिवशी शिक्षणाधिकारी यांनी केले नवागतांचे स्वागत

 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : उन्हाळी सुट्टीनंतर आज तालुक्यातील २०५ शाळा सुरू झाल्या असून शाळेचे पहिल्या दिवशी जिल्हा परिषद गोंदियाचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कादर शेख यांनी तिरोडा येथील शहीद मिश्रा शाळा, उत्तर बुनियादी शाळेत नवागतांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भरवले. आज दिनांक ३० जून रोजी उन्हाळी सुट्याच्यानंतर सुरू झालेल्या जिल्हा परिषद, नगर परिषद, शासकीय अनुदानित व खाजगी शाळांचे सुरुवात झाली असून आज शुक्रवारला शाळेचे स्वागताकरिता ग्राम पंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती व विद्यार्थ्यांचे पालकासमोर नवागत विद्यार्थ्यांना वातावरणात अध्यापनाची सुरुवात करण्यात आली.

आज शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व न.प. व जि.प.चे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शहीद मिश्रा विद्यालय व उत्तर बुनीयादी शाळेत गट शिक्षणाधिकारी मधुकर पारधी, केंद्रप्रमुख चौधरी, मुख्याध्यापक के.ए. रहांगडाले यांचे सह भेट देऊन नवागत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व मिस्टान्न भरवून, शालेय गणवेश व पुस्तकाचे वाटप करून विद्यार्थ्यांशी प्रार्थनेनंतर संवाद साधला त्याचप्रमाणे सर्व शासकीय अनुदानित, नगर परिषद व जिल्हा परिषद शाळेतून सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठांनासह पोषण आहाराचे वाटप करण्यात आले, पहिल्या दिवशी सर्व शाळेतून पुष्प वा पुष्पगुच्छ देऊन स्वागत विद्यार्थ्यांना पुस्तके व शालेय अशी माहिती गटशिक्षणाधिकारी शाळेतील नवागत विद्यार्थ्यांचे करण्यात येऊन आनंदमय गणवेश देण्यात आले असून मधुकर पारधी यांनी दिली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *