औषधी दुकान मालकाचा तरूणीवर अत्याचार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : येथील पिल्लांरे कॉम्प्लेक्स मध्ये असणाºया समर्थ मेडिकलचे प्रोप्रायटर उमेश भांडारकर वय ४० यांने २३ वर्षीय अविवाहित मुलीवर अनेक वेळा अतिप्रसंग केल्याने मुलीच्या तक्रारीवरून साकोली पोलीस स्टेशनमध्ये मंगळवार दिनांक २७ जूनला कलम ३७६ ,२ , ५०६ अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली. सेंदूरवाफ्यातील प्रगती कॉलनी येथील पिल्लारे कॉम्प्लेक्समधील समर्थ मेडिकलचे प्रोप्रायटर उमेश भांडा- रकर यांनी १० फेब्रुवारी ते दोन एप्रिल २०२३ दरम्यान मुलीवर चार वेळा अतिप्रसंग केला. मुलीला कारने घेऊन मोहघाटा जंगलात तसेच भंडारा येथील हॉटेलमध्ये तिच्यावर अतिप्रसंग केला यासोबतच मुलीचे व्हिडिओ व फोटो काढून ते फेसबुक वर टाकून तिला धमकी दिल्यामुळे मुलगी घाबरून त्याच्या जबरदस्तीला बळी पडत गेली परंतु नेहमीच्या त्रासाला व जबरदस्तीला कंटाळून तिने २७ जूनला साकोली पोलीस स्टेशनमध्ये उमेश भांडारकर यांनी केलेल्या अतिप्रसंगचा भंडाफोड केला. साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांनी अत्यंत दक्षतेने या प्रकरणाची दखल घेत आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय खोकले हे अधिक तपास करीत आहेत

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *