राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलबाहेर महिलांची निदर्शने

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी चंद्रपूर : मनसेच्या स्थानिक पदाधिकाºयांनी फसवणूक केल्याचा आरोप करीत अन्यायग्रस्त महिलांनी मनसे नेते राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉ- टेलबाहेर निदर्शने केली. कलकाम नावाच्या खासगी कंपनीत पैसे गुंतवणाºयांची १०० कोटी रुपयांनी फसवणूक झाली आहे. या फसवणूक प्रकरणी कंपनी संचालक तथा स्थानिक अधिकारी, अशा सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. सध्या हा आरोपी जामिनावर सुटला आहे. या कंपनीचे संचालक व अधिकारी आरोपी असतानाही मनसेचे स्थानिक पदाधिकारी त्यांना मदत करीत आहेत. अशा पदाधिकाºयांवर तातडीने कारवाई करावी, त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, या मागणीसाठी या महिला येथे आल्या. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राज ठाकरे पक्षाच्या पदाधिकाºयांची बैठक घेत होते. यामुळे एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी महिलांना भेटण्यासाठी वेळ दिली होती, असे महिलांकडून सांगण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *