माओवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात माओवादी शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर करतात. सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात फोटके जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पुरून ठेवलेल्या साहित्याचा वापर माओवाद्यांकडुन विविध नक्षल सप्ताहात तसेच इतर प्रसंगी केला जातो. गडचिरोली पोलिस दलाने आज अशाच प्रकारचा माओवाद्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळुन लावला आहे. उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोलिस स्टेशन कोटगुलपासुन ५०० मीटर अंतरावर असलेल्या पहाडीच्या पायथ्याजवळ गोंडरी जंगलपरिसराकडे जाणाºया पायवाटेवर आज माओवाद्यांनी पोलिस पथकाला नुकसान पोहविण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहित्य पुरुन ठेवले असल्याची गोपनिय माहिती कोटगूलचे प्रभारी अधिकारी धनंजय कुलकर्णी यांनामिळाली. सदर माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली. त्यावरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी बीडीडीएस पथकाला बोलविण्यात आले. बीडीडीएस पथकातील विविध अत्याधुनिक उपकरणाद्वारे जंगल परिसरात सर्चिंग करण्यात आले.

दरम्यान, एक संशयित जागा मिळून आल्याने सदर घटनास्थळाची पाहणी केली असता, अंदाजे दिढ ते दोन फुट जमीनीमध्ये स्फोटक पदार्थ भरुन असलेले प्रेशर कुकर मिळून आले. त्याची बिडीडीएस पथकाकडुन एक्सप्लोझीव्ह किटने तपासणी केली असता, त्यामध्ये अंदाजे २ किलो हाय एक्स्प्लोझीव्ह असल्याची खात्री झाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्फोटक पदार्थ घटनास्थळावरच नष्ट करण्यात आले. तसेच सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम. रमेश, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या नेतृत्वात कोटगुलचे प्रभारी अधिकारी धनंजय कुलकर्णी, बीडीडीएस पथक प्रभारी अधिकारी मयुर पवार, पोहवा पंकज हुलके, अनंतराव सोयाम, संचिन लांजेवार, तिम्मा गुरनुले यांनी यशस्वीरित्या पार पाडली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक केले. तसेच माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून माओवाद्यांनी हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.