पट्टेदार वाघाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागभीड : नागभीड वनपरि क्षेत्रातील चिंधिचक शेतशिवारातलगतच्या जंगल परिसरात पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, ७ डिसेंबर रोजी उजेडात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घोडाझरी जंगल परिसरातला लागून असलेल्या चिधिंचक येथील भास्कर आठमांडे यांचे शेत आहे. त्याला लागूनच जंगल परिसर असून, वाघाच्या पायाक- डील भाग कुठल्यातरी प्राण्याने खाल्लेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. माहिती कळताच नागभीड वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्रथमदर्शनी या वाघाला जंगली रानकुत्र्यांनी हल्ला करून मारले असावे, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. घटनास्थळी पंचनामा व विच्छेदन करण्यात येत आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *