जिल्ह्याात वादळी वाºयासह पावसाची हजेरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी चंद्रपूर : जिल्ह्यात शनिवारी दूपारपासून सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण होऊन चंद्रपूर महानगरासह काही भागात वादळी वाºयासह हलका पाऊस झाला. तर कोरपना तालुक्यातील वडगाव येथे झाड कोसळून वैशाली गोवर्धन उरकुडे (३५) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. जोरदार वाºयामुळे शेतशिवारातील शेतकºयांच्या मंडपावरील टीनपत्रे उडून गुरांच्या चाºयाचे नुकसान झाले. तर काही भागात घरांचेही नुकसान झाले. तर, कोरपना-हातलोनी मार्गावर बाभळीचे मोठे झाड उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरूवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस वाढ होऊन तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला होता. त्यामुळे वाढत्या उकाड्याने नागरिक त्रस्त होते. परिणामी दूपारच्या सुमारास रस्त्यावर शुकश- ुकाट दिसून येत होता. दरम्यान, शनिवारी सकाळी सूर्य आक ओकत असताना दूपारी अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले. कोरपना तालुक्यात दूपारच्या सुमारास वादळवारा, विजेच्या कडकडाटासह तासभर जोरदार पाऊस झाला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *