खा. सुनील मेंढे यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील खापा येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण आज ११ रोजी खासदार सुनिल मेंढे यांच्यासह करण्यात आले. खापा येथे नवीन प्रशासकीय इमारत तयार करण्यात आली असून या इमारतीमुुळे प्रशासकीय कारभार करणे अधीक सूकर होणार आहे. ग्रामस्थांची कामे लवकर होऊन त्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील अशी अपेक्षा खा.मेंढे यांनी व्यक्त करीत ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके, आमदार राजू कारेमोरे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप सार्वे, माजी खासदार शिशुपाल पटले, तुमसरचे माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, काशिराम टेंभरे, विठ्ठल कहालकर, राजू माटे, मुन्ना पुंडे, खापा येथील सरपंच किर्ती राजेंद्र पिकलमुंडे, लक्ष्मीकांत सेलोकर, कल्याणा भुरे, गीता कोंडेवार, विनोद सिंगाडे, संतोष वाहिले, प्रियंका कटरे, विनोद तुमसरे, अमरिश सानेकर, राजा लांजेवार, बाल्या बिसने, अरविंद पटले, पंकज बालपांडे, मंगेश मानापूरे, पवन पाटील, राजहंस ठवकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *