ट्रक-दुचाकी अपघातात विद्यार्थी ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागभीड : शालेय विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असलेल्या शिक्षिकेच्या स्कुटीला ट्रकने जोरदार धडक दिली. यात एक विद्यार्थी जागीच ठार, तर अन्य एका विद्यार्थ्यासह शिक्षिका गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवार, ५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास चिंधिचक बसस्थानकाजवळ घडली. अनिकेत विठोबा शेंडे (१२, रा. किटाळी बो.) असे मृतकाचे नाव आहे. तर अश्विनी बाबाराव पाटील (रा. तळोधी) व कुणाल वलधरे (१५, रा. चिंधिमाल) अशी जखमींची नाव आहे. किटाळी (बो.) येथील प्रशांत विद्यालय येथे कुणाल वलधरे (इयत्ता ९ वी ) व अनिकेत शेंडे (इयत्ता ६ वी) हे शिक्षण घेत होते.

याच विद्यालयाची शिक्षिका अश्विनी पाटील ही नेहमीच या विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात होती. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळच्या शाळेला ७ वाजताच्या सुमारास स्कुटीने ती या विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. यावेळी चिंधिचक बसस्थानाकावरून वळण घेत असताना नागभीडकडून भरधाव येत असलेल्या ट्रकने स्कुटीला जोरदार धटक दिली. यात ट्रकच्या चाकात २० ते ३० फुट फरफटत गेल्याने अनिकेत शेंडे हा जागीच ठार झाला. तर कुणाल वलधरे हा ट्रकच्या समोरील चाकात अटकून राहिला. तब्बल दोन तासाच्या रेस्क्यु नंतर त्याला जिवंत काढण्यात यश आले. दरम्यान, चिधिंचक बसस्थानकाजवळ गतिरोधकाची लावण्याची मागणी किटाळीचे सरपंच छगन कोलते, चिंधिचकचे सरपंच हरिदास वरठे, उपसरपंच प्रदिप समर्थ यांनी अधिकाºयांकडे लावून धरली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.