एक लाखाच्या रोखीसह अट्टल चोरटा जाळ्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : शहरातील रामनगर परिस- रात १ एप्रिल रोजी घडलेल्या घरफोडी घटनेतील आरोपीला ५ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. इरफान अब्दूल अलीम सय्यद रा. कटंगीटोला असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याजवळून एक लाख रुपये रोख जप्त केले. रामनगर येथील अंकिता रमेश मस्के यांच्या घराचे कुलूप तोडून १ एप्रिल रोजी अज्ञात आरोपीने आलमारीत ठेवलेले ३ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने व २ लाख ४९ हजार रुपये रोख असा ६ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुददेमाल चोरी केला.

याप्रकरणी रामनगर पोलिसांनी भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी घटना स्थळाची पाहणी करुन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी इरफान सय्यद याला संशयाच्या आधारे ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याच्याजवळून १ लाख रुपये रोख जप्त केले. तर दागिने बहिणीकडे ठेवल्याचे त्याने सांगितले. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *