समृद्धी महामार्गावर बर्निंग कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वर्धा : भरधाव कार अनियंत्रित होऊन समृद्धी महामार्गावर बाजूला असलेल्या लोखंडी कठड्याला धडकल्याने अपघात होऊन कारने पेट घेतला. यात विक्रांत घाटे आणि आशिष मुजरिया रा. माळगीनगर नागपूर हे दोन जण जखमी झाले. हा अपघात समृद्धी महामार्गावरील येळाकेळी शिवारात शुक्रवार ५ रोजी घडला. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रांत घाटे आणि आशिष मुजरिया हे नागपूर येथून पुणे येथे एम. एच. ३१डी. व्ही. ३६४० क्रमांकाच्या कारने जात होते. येळाकेळी शिवारात कारचे तामपान वाढल्याने कार अनियंत्रित होऊन लोखंडी कठड्याला धडकली. यात चालक विक्रांत घाटे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आशिष मुजरिया किरकोळ जखमी झाला. पाहता पाहता कारनेही पेट घेतला. या घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना रात्री ३ वाजता मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा करून जखमींना सावंगी दवाखान्यात पाठविले. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतल्याचे समृद्धी महामार्ग, जामचे पोलिस उपनिरीक्षक सुधाकर कुमरे यांनी दिली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.