स्वतंत्र राज्यासाठी विदर्भवाद्यांची आंदोलन मालिका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी यवतमाळ : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादी आंदोलनांची मालिका करणार आहेत, अशी माहिती माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी बुधवार, २१ सप्टेंबर रोजी झालेल्या पत्रपरिषदेत दिली. या पत्रपरिषदेत रंजना मामर्डे, कृष्णा भोंगाडे, राजेंद्र झोटिंग, हेमंत मुदलीयार, युवराज साळवे, अ‍ॅड. अजय चमेडिया, जयंत बापट, अरुण जोग, मिलिंद दामले, सोनाली मरगडे, सुरेश माळवी, प्रेमा पत्रीवार, महादेव गुघाणे, विजय निवल, मधुसूदन कोवे उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. चटप पुढे म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलन तीवह्य करण्याच्या दृष्टीने बुधवार, २८ सप्टेंबर रोजी विदभार्तील सर्व जिल्हा व तालुका मुह्ययालयी कालबाह्य झालेल्या व विदर्भातील जनतेची फसवणूक करणाºया नागपूर कराराची होळी केली जाणार आहे. तसेच २ आॅक्टोबर रोजी गांधीजयंती दिनी जिल्हा व तालुकास्थानी कार्यकर्ते गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुलेंच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करणार आहे. ३ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदन पाठवून ११६७ वर्षांपासून सुरू असलेली स्वतंत्र विदर्भाची मागणी कायमची निकाली काढावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.