आता स्वतंत्र विदर्भासाठी आरपारची लढाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी शेकडो आंदोलने करण्यात आली. मात्र, राज्यकर्त्यांनी वेगळ्या विदर्भाला नेहमीच बगल दिली. त्यामुळे आता धरणे, आंदोलन भरपूर झाले आता स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत आरपारची लढाई लढणार असा इशारा देत तत्पूर्वी ९ आॅगस्ट रोजी वीज समस्यांना घेऊन ऊर्र्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर स्थित निवासस्थानाला घेराव घालणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केंद्रार यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

केंद्र शासनाने विदभार्चे स्वतंत्र राज्य निर्माण करावे, विजेची दरवाढ राज्य शासनाने तत्काळ मागे घ्यावी, शेतीपंपाला दिवसाचे भारनियमन बंद करावे, विदर्भात होऊ घातलेले दोन्ही वीज प्रकल्प विदर्भाबाहेर न्यावे, वैधानिक विकास महामंडळ नाही तर स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, बल्लारपूर ते सुरजागड रेल्वे मागार्ला केंद्र सरकारने तत्काळ मंजूरी प्रदान करावी, संपूर्ण विदर्भात वीज निर्मिती होत असतांना शासनाने विजेचे दर वाढविले आहे, ही दरवाढ तत्काळ रद्द करण्यात यावी, स्वतंत्र विदर्भ राज्य व विजेची दरवाढ, नवीन वीज प्रकल्प रद्द करावे या मागण्यांना घेऊन ९ आॅग्स्ट रोजी दुपारी १२ वाजता नागपूर येथील संविधान चौकातून धरमपेठ येथील ऊजार्मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापर्यंत लाँगमार्च काढण्यात येऊन त्यांच्या घराला घेराव घालण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला मुकेश मासुरकर, सुधा पावडे, तात्यासाहेब मत्ते, अरविंद भोसले, अरुण मुनघाटे, राजेंद्रसिंह ठाकुर, अमिता मडावी, घीसू पाटील खुणे, नसीर जुम्मन शेख, रमेश उप्पलवार, शालिक नाकाडे आदी उपस्थित होते

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *