युवाशक्ती संघटनेतर्फे शिवजन्मोत्सव साजरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यामध्ये १८ फेब्रुवारीला युवाशक्ती संघटने सर्व सदस्य पुर्ण रात्र जागून चांदणी चौक परिसरातील साफसफाई करून शिवजन्मोत्सवाची तयारी करण्यात आली. १९ फेब्रुवारीला सोमवारी सकाळी ९ वाजता युवाशक्ती संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन राज्याभिषेक करण्यात आले. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय’, अशा शिव गर्जना करीत चांदणी चौक परिसर दणाणून सोडला. १९ फेब्रुवारीला युवाशक्ती संघटनेतर्फे शिवजयंती निमित्त भंडारा शहरातील चांदणी चौक येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भंडारा शहरात भगवा ग्रुप, युवाशक्ती संघटना, भृशुंड ढोल ताशा व ध्वज पथक आणि फाऊंडेशन भंडारा, युथ फॉर नेशन, हिंदवी प्रतिष्ठान, संभाजी महाराज प्रतिष्ठान, असर फाऊंडेशन, बालमित्र माँ शारदा उत्सव मंडळ, वरदविनायक गणेश उत्सव मंडळ भंडारा यांच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली होती.

बाईक रॅलीचे स्वागत चांदणी चौक येथे युवाशक्ती संघटनेतर्फे करण्यात आले. याप्रसंगी संघटनेच्या वतीने चांदणी चौक येथे महाराजांच्या प्रतिमेची पुजा करून माल्यार्पण करण्यात आले. व मठ्ठा वाटप करुन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमात भंडारा शहरातील तमाम शिवभक्तांनी आपली उपस्थिती दर्शविली होती व सर्व कार्यक्रम शांततेत आणि नियमानुसार पार पाडण्यात आले. या शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या बाईक रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले ते रॅलीत सहभागी झालेले महिलावर्ग तसेच युवा तरुणवर्ग. बाईक रॅली संपल्यानंतर युवाशक्ती संघटनेतर्फे चांदणी चौक येथे दुपारी १ ते ५ आयुष्यमान कार्ड व आभा कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये १०५ शिबिरार्थीने लाभ घेतला. यावेळी गृपचे अध्यक्ष गोवर्धन निनावे, राकेश खेडकर, कुणाल बोकडे, सुर्यांश भंडारी, भुषण देशमुख, कृपाल तांडेकर, सौरव तांडेकर, बबलू खंडाईत, विक्की सोनवाने, सागर असाटी, रवी खेडकर, शुभम सोनवाने, प्रद्युम्न्य निनावे, योगेश कोहाड, आदित्य चौधरी, गौरव चोपकर, यश अंबाळकर, आकाश सोनवाने, यश चिंचुलकर, लोकेश मदनकर, गौरव पारवे, अनमोल पारवे, भुरे मामा व युवाशक्ती संघटनेचे ईतर कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *