आंघोळीला गेलेल्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : धूलिवंदनाच्या दिवशी गावाशेजारील १६ वर्षीय विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील लाखोरी येथे घडली. चैतन्य राजेश मुटकुरे असे मृत मुलाचे नाव आहे. ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे लाखोरी गावावर शोककळा पसरली. चैतन्य मुटकुरे हा लाखोरी येथील उज्वल विद्यालयात १० वी वर्गात शिक्षण घेत होता. धूलिवंदन खेळून झाल्यानतंर चार ते पाच मित्रांसोबत तो गावाजवळ असलेल्या तलावात अंघोळीसाठी गेला होता. मित्रांसह पाण्यात उतरला असता चैतन्यला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पोहायला येत नसल्याने तो पाण्यात बुडू लागला. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती ग्रामस्थांना होताच लोकांनी तलावाकडे धाव घेत चैतन्यचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला.
पोलिसांना देखील या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपत्ती व्यवस्थापनची चमू सह तलावात मृतहाचा शोध सुरू केला. काही तासाच चैतन्यचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी लाखनी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. धूलिवंदनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *