अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या आरोपीला भंडारा जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावासासह आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली . सौरभ अजय राऊत, वय २२ वर्षे रा. सिव्हील वार्ड साकोली असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन पिडीता ही माहे फेबु्रवारी २०२० पासुन लाकडॉवुनच्या काळात तिच्या मावसी कडे राहत होती. घटनेच्या दिवशी पिडीता गावात मेडीकल औषध घेण्याकरीता गेली असतांना मेडीकल बंद असल्याने परत येत असतांना आरोपी सौरभ राऊत याने पिडीतेला बळजबरीने जवळच्या झुडपामध्ये नेवुन तिच्यावर अत्याचार केला व याबाबत कोणाला काही सांगीतल्यास त्याच्याकडील असलेले अमली पदार्थ तिच्या अंगावर टाकण्याची धमकी दिली. तक्रारीवरून याप्रकरणी पोलीस स्टेशन साकोली येथे कलम ३७६ (३), ३२३,५०४, ५०६ भांदवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक निलम बाबर यांचेकडे सोपविण्यात आला. त्यांनी सदर गुन्हयाचा तपास करुन गुन्हयातील आरोपी ाौरभ अजय राऊत १ यास तात्काळ अटक करुन गुन्हयात साक्षपुरावा गोळा केले. सदर गुन्हयाची सुनावणी भंडारा जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधिश श्री. पी. बी. तिजारे सा. (स्पेशल जज पोक्सो) भंडारा यांचे न्यायालयात चालविण्यात आली. गुन्हयात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वडील अ‍ॅड. दुर्गा तलमले यांनी योग्य बाजु मांडुन साक्षदार तपासले. दिनांक २७ जुन २०२३ रोजी पुराव्यांचे आधारे आरोपी सौरभ अजय राऊत याच्यावर दोष सिध्द झाल्याने आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास व ४ हजार ५०० रुपए आर्थिक दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, सहा.पोलीस अधीक्षक सुंशात सिंग ,तुमसर पोलीस अधीक्षक रश्मिताराव, साकोली पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांचे मार्गदर्शनात महिला पोलीस हवालदार चुनरिया भुरे यांनी योग्य पैरवी अधिकारी म्हणुन कामकाज सांभाळले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *