मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त आज महाआरोग्य शिबीर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त स्थानीय जिल्हा रुग्णालयात भव्य आरोग्य शिविराचे आयोजन स्थानीय जिल्हा रुग्णालयात करण्यात येणार आहे. बाळासाहेबांची शिवसेना द्वारे दिनांक ९ फेब्रुवारी सकाळी ९ वाजेपासून आयोजित या महा शिबिरात विविध रोगांच्या तपासणी, रक्तदाना सोबत दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र आणि बॅटरी ट्रायसिकल सुद्धा वितरीत करण्यात येतील. या शिविरात नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ञ चीकीत्सकांद्वारे तपासणी करून उपचार देण्यात येईल. भंडारा जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना द्वारे आयोजित या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते खासदार सुनील मेंढे यांच्या उपस्थितीत करण्यात येईल. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, जिल्हा शल्य चिकित्सक दीपचंदसोयाम व न.प. मुख्याधिकारी विनोद जाधव उपस्थित राहतील. जिल्हा रूग्णालयात ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजे पासून जिल्ह्यातील रुग्णाचे उपचार नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ञ चिकित्सकाद्वारे करण्यात येईल. या आरोग्य शबीरात थॅलेसिमीया, थॉयरॉईड, हृदयरोग, दंतचिकित्सा, अस्थिरोग, मधूमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग सारख्या तपासण्या करण्यात येणार आहेत. सोबतचा शिबिर दरम्यान दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र वाटप, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा फुले आरोग्य योजनेच ई-कार्ड वाटप या बरोबरच दिव्यांग व्यक्तींना बॅटरी ट्रायसिकल, माता व बाल कीट तथा नेत्र तपासणी करून गरजूंना चष्मे वाटप करण्यात येईल. तरी जिल्ह्यातील सर्व गरजू रूग्णांनी या मोफत महाआरोग्य शिबीरात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल गायधने, उप जिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, शहर प्रमुख मनोज साकोरे, शहर संघटक नितीन धकाते यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *