लाच प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाची निर्दोष सुटका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : लाच प्रकरणात सरकारी पक्ष पोलीस उपनिरीक्षकावर लावण्यात आलेले आरोप सिध्द करू न शकल्याने न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका केली. अमोल तुळजेवार असे निर्दोष सुटका करण्यात आलेल्या पो.उपनिरीक्षकाचे नाव आहे. सेवा निवृत्त पोलीस अधीकारी महेबुब खान पठान रा. भंडारा यांनी दि. १६ डिसेंबर २०१५ रोजी भंडारा पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरिक्षक अमोल तुळजेवार यांचे विरुध्द लेखी तक्रार दिली त्यात महेबुब खान यांचा मुलगा इस्माईल खान व त्याचे दोन मित्राविरुध्द पोलीस स्टेशन भंडारा येथे भां. द. वि. चे कलम ३६५ अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास पोउपनि. अमोल तुळजेवार यांचेकडे होता. सदर गुन्ह्याचे ‘क’ फायनल करण्याकरीता ९० हजार रूपयाची लाच मागितल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले होते.

सदर प्रकरणात तत्कालीन विशेष पोलीस महानिरिक्षक रविंद्र कदम यांनी अभियोग चालविण्यास मंजुरी प्रदान केली होती. प्रकरणाचा तपास नागपूर पोलीस निरिक्षक रमाकांत कोकाटे यांनी करुन आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सात (७) साक्षदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात आरोपी पैशाची मागणी करेल कि नाही याकरीता एकूण पाच (५) पंचनामे तपासी अधिकाºयाने केले होते तसेच आरोपीने सदर प्रकरणात सेटलमेंट करण्याकरीता छाया देशपांडे हिला १० हजार रूपये द्यावे लागेल असे तपासी अधिकाºयांनी नमुद केले, परंतु छाया देशपांडे हिची या प्रकरणाला समंती होती का तसेच सदर प्रकरणात छाया देशपांडे हिचे बयान सुध्दा तपासी अधिकाºयाने नोंदविले नव्हते.

सदर प्रकरणात हरीष कोकाटे यांना समजोता करण्याकरीता श्रीमती देशपांडे यांना पैसे द्यावयाचे नव्हते, त्यांना फक्त पैशे आरोपीलाच द्यायचे होते. त्याचप्रमाणे प्रत्येक वेळी झालेल्या संभाषणाची हॅशवॅलू ज्या अधिकाºयांनी काढली त्या अधिकाºयाची सही हॅशवॅलू सटीर्फीकेटवर नसणे हे या प्रकरणात फार मोठी तफावत होती. तसेच सदर प्रकरणात तक्रारकर्ता महेबुब खान पठान याने कबुल केले कि, त्यांचे मुलाविरुध्दचे प्रकरण बंद करण्याकरीता आरोपीने त्यांना स्वत: करीता ९० हजार रूपयाची लाच मागीतली नाही.

तपासी अधिकाºयांनी वारंवार कसेही करुन आरोपीने लाचेची मागणी करावी याकरीता सापळा रचला जेणेकरुन कशाही प्रकारे आरोपी सापडला जाईल, परंतु त्यांना यश प्राप्त झाले नाही, तसेच तक्रारी यांना कशाही प्रकारे आरोपीवर दबाव तंत्राचा उपयोग करावयाचा होता कारण त्याचे मुलाविरुध्दचे तपास करण्याचा अधिकार आरोपीकडे होता अशा अनेक बाबी समोर आल्या. यासंपुर्ण घडामोडी वरुन सरकारी पक्ष पोउपनि. अमोल तुळजेवार यांच्यावरील आरोप सिध्द करु शकले नाही त्यामुळे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मार यांनी आरोपी पोलीस उपनिरिक्षक अमोल तुळजेवार यांची सदर प्रकरणातुन निर्दोष सुटका केली. आरोपी तर्फेअ‍ॅड. राजेश राऊत यांनी बाजु मांडली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *