झाकली मूठ सव्वा लाखाची !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : सध्या लाखनी येथील एका प्रकरणात नगर रचनाकार विभाग, महसूल विभाग व पोलीस विभाग अशा तीन विभागाच्या वादात कर्मचारी मात्र मानसिक तणावात दिसून येत असून हा प्रकरण तालुक्यात चचेर्चा विषय ठरत आहे. या प्रकरणात नगर रचनाकार विभाग व महसूल विभागाच्या जुन्या अधिकाºयांपासून तर कार्यरत कर्मचाºयांपर्यंत संबंधित विभागाने एका संधीसाधू व्यक्तीला हाताशी धरून काही कर्मचाºयांना चौकशीच्या फेºयात मानसिक त्रास देण्याच्या प्रयत्न चालविलेला आहे.

अटक व्हायची नसेल तर टेबलाखालून व्यवहार करा असा सूचना वजा इशारा भंडारा येथे नेऊन दिल्याची खात्रीलायक माहिती आहे. यातील काही कर्मचाºयांमध्ये कमालीचा मानसिक तणाव असून त्यातून मार्ग कसा काढायचा ? या प्रयत्नात असले तरी काही कर्मचारी आपल्या संघटनेच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्याच्या प्रयत्नात आहेत. जर संबंधित विभागाचे कर्मचारी संघटनेच्या मार्फत न्याय मागणीसाठी गेल्यास या विभागातील तो टेबलाखालील व्यवहार करणारा कोण ? याचा शोध लागल्याशिवाय राहणार नाही. यासंबंधी अधिक माहिती मिळाली असता एका हेवी वेट लोकप्रतिनिधीने या गंभीर प्रश्नाची दखल घेत पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून सदर गंभीर प्रकरणाची माहिती देऊन संबंधित विभागाच्याअधिकाºयाला बदलवण्याची मागणी केली असल्याची माहिती आहे.

येत्या एक-दोन दिवसात या प्रकरणाचा निकाल जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याच्या गृहमंत्र्यांच्या दरबारी जाण्याची शक्यता असून याचा निकाल फडणवीस दरबारी लागण्याची विश्वसनीय माहिती आहे तेव्हा तीन विभागातील वादात कर्मचाºयांना मानसिक त्रास होत असल्याने त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचें विचारात असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर कर्मचाºयाने बोलून दाखविले आहे. याप्रकरणीजिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांनी वेळीच लक्ष घालून दोन महत्त्वाच्या विभागाची गंभीरतेने चौकशी केल्यास मोठ्या प्रश्नाचा उलगडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्ष २०१० पासून कार्यरत कर्मचाºयांना चौकशीची भीती दाखवून व एका सामाजिक कार्यकत्यार्चा आधार घेऊन सदर प्रकरणी दोन विभागातील कर्मचाºयांना आर्थिक देवांनी घेवांनी साठी भंडारा येथे बोलवून झाकली मूठ सव्वा लाखाची असे सांगत संबंधित विभागाच्या अधिकाºयांना वेठीस धरण्यात येत असल्याच्या प्रकार लाखनीत होत असल्याचे चित्र आहे तेव्हा कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा छळा लावल्यास तो तिसरा कोण ? भंडारा येथे बोलावणारा कोण ? तो खंडणी मागणारा कोण ? या विविध प्रश्नांचे उत्तर त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नसल्याचे बोलले जात आहे.

या प्रकरणांमध्ये झालेल्या गैरव्यवहारावर प्रश्नचिन्ह निर्माण करून तपासाचा ससे मिरा लावण्यात आला आहे. गैरव्यवहार उघड करणे हे जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे. पण त्यातून स्वत:चे हित साधून कसूर नसलेल्यांना वेठीस धरुन मानसिक व आर्थिक त्रास देणे हे अयोग्य असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात संबंधित विभागासह अनेकांनी मीडिया ट्रायल करून हात ओले केल्याची चर्चा चव्हाट्यावर आली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *