बावनथडी प्रकल्पातून त्या १२ गावांच्या सिंचनासाठी माजी खा.शिशुपाल पटले यांनी घेतली आढावा बैठक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : बावनथडी सिंचन प्रकल्पातून त्या १२ गावांना सिंचनाची सोय करणे या सह चांदपूर जलाशयातून बारमाही सिंचन होण्यासाठी उपाययोजना करणे, बावनथडी सिंचन प्रकल्पाचे ओव्हरफ्लो चे पाणी चांदपूर जलाशयात टाकणे, सोंड्याटोला उपसा सिंचनेचे ९ पंप नियमित चालविण्यासाठी विद्युत विभागाकडे लोड वाढविण्यासाठी परवानगी साठी प्रस्ताव देणे, सोंड्याटोला उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्यासाठी प्रस्ताव सादर करणे इत्यादी विषयांवर उपाययोजना करण्यासाठी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी पुढाकार घेऊन नुकतीच बावनथडी विश्रामगृह तुमसर येथे आढावा बैठक घेतली. बावनथडी सिंचन प्रकल्प चे पाणी तुमसर तालुक्यातील गोबरवाही परिसरातील गोबरवाही, पौनारखारी, येदरबूची, हमेशा, सुंदरटोला,सितासावंगी,सोदेपुर,गुडरी,खंदाळ,धामलेवाडा इत्यादी गावांना मिळत नाही.

या गावातील शेतकºयांच्या ऐकून ११३७ हेक्टर शेतजमिनीला सिंचनाची सोय होण्यासाठी डीपीआर तयार करून विशेष बाब म्हणून मान्यता देण्यासाठी प्रस्ताव तात्काळ शासणाला पाठविण्याचे निर्देश अधीक्षक अभियंता रवी पराते यांनी दिले तसेच चांदपूर जलाशयातून बारमाही सिंचन होण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बावनथडी प्रकल्पाचे ओव्हरफ्लो चे पाणी चांदपूर जलाशयात टाकून जलाशयाचे वॉटर लेव्हल वाढविण्यावरही चर्चा करण्यात आली. सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेवर ९ पंप बसविण्यात आले आहेत.

परन्तु ९ पंप चालविण्या इतका विद्युत लोड नसल्याने एका वेळी ९ ही पंप चालविता येत नाही.अश्यावेळी नदीला पाणी असताना पाणी उचलता येत नसल्याने चांदपूर जलाशय भरल्या जात नाही.त्यामुळे शेतकºयांना दुष्काळाचा सामना कारावा लागतो.ही वेळ येऊ नये म्हणून ९ ही पंप एका वेळी चालवता येण्यासाठी विद्युत विभागाकडून लोड वाढविण्यासाठी परवानगी घेण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेतून विद्युत मोटार पंपाद्वारे पाणी उपसा करून चांदपूर जलाशयात सोडण्यात येते.वषार्ला करोडो रुपयाचे विद्युत बिल येत असते.हा सर्व विद्युत बिलाचा पैसा शेतकºयांकडून वसूल केला जातो.शेतकºयांकडून वसूल होणारा हा विद्युत बिलाचा पैसा वाचविण्यासाठी ही योजना सौरऊर्जेवर चालविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात यावे अशी सूचना माजी खासदार शिशुपाल पटले यांनी या आढावा बैठकीत केले.

या आढावा बैठकीत सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता रवी पराते,बावणथडी प्रकल्प संघर्ष समिती चे अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे, उपाध्यक्ष शरद खोब्रागडे, डोमसिह वाघमारे, जगदीश गभने, बावणथडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता ,के.डी.दमाह, इन्वेष्टीगेशन सर्वेक्षण विभागाचे कार्यकारी अभियंता बानुबाकुडे, उपविभागीय अभियंता श्री.कांबळे, उपविभागीय अभियंता (चांदपूर जलाशय) श्री.दलाल,मेकॅनीकल विभागाचे अधिकारी,स्थानिक स्तर विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद ल.पा. चे कार्यकारी अभियंता, बावनथडी चे शाखा अभियंता श्री.बडोले, आदी अधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *