एक नेशन एक इलेक्शन पेक्षा एक नेशन एक एजूकेशन हवे-अनिल भुसारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर येथे संभाजी ब्रिगेड कार्यकर्ता प्रशिक्षण व रोजगार विषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वासदादा बडवाईक संभजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष भंडारा गोंदिया क्षेत्र, प्रमुख मार्गदर्शक अनिल दादा भुसारी लेखक व व्याखाते, रोजगार विषयक मार्गदर्शक पंकज घाटे, गणेश नंदनवार कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. जिजाऊ वंदना करून कार्यक्रमाला सुरुवात केली. अनिल भुसारी यांनी धर्मसत्ता, अर्थसत्ता, शिक्षणसत्ता, राजसत्ता व प्रचार प्रसार माध्यमसत्ता ओबिस्ािंनी काबीज करायला हवेत. तसेच एक नेशन एक इलेक्शन जनतेला जेवढे महत्वाचे नसून त्यापेक्षा अधिक एक नेशन एक एजुकेशन धोरणं असावे. जे जे म्हणून देश विकसित आहेत त्या देशात शिक्षण आणि आरोग्य यावर अधिक सरकार द्वारे खर्च केल्या जातो माञ भारतात याबतीत योग्य सुविधांचा अभाव असल्याचे अनिल भुसारी म्हणाले. पंकज घाटे यांनी स्पर्धा परीक्षा व उद्योगधंदे याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्या नोकºया संपण्याच्या मार्गावर असून उद्योगधंद्यात खूप मोठ्या संधी आहेत. बहुजनांच्या मुलांनी आता नौकरी मागण्यापेक्षा देणारे होण्याकरिता उद्योगाकडे वळावे असे ते म्हणाले. सौरभ कुथे संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष लाखांदूर यांनी उद्योगाबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, उद्योगधंदे दुसºयांचे आहेत मात्र ग्राहक सर्वात जास्त बहुजन आहोत. मग उद्योगधंदे हे पण आपलेच असायला पाहिजेत अस सांगितलं.

विश्वास दादा बडवाईक यांनी राजकीय भूमिकेविषयी सांगितले की, काँग्रेस, राष्ट्रवादी व बीजेपी मध्ये आपले कुणबी, मराठा व ओबीसी लोकांचे आमदार खासदार आहेत. परंतु निर्णय प्रकियेत यांना स्थान नाही. यामागच कारण काय तर झेंडा आपला आहे मात्र दांडा दुसºयाचा आहे. तसेच राजकारण चांगल्या माणसांचा नाही असे सांगतात. हे विचार बदलविण्यासाठी व दांडाही आपलाच व झेंडाही आपलाच लावण्यासाठी संभाजी ब्रिगेडमध्ये सुशक्षित तरुणाना खूप मोठी संधी असल्याचे सांगितले. लाखांदूर तालुक्यात संभाजी ब्रिगेडची शाखा उघडून नियुक्तपत्र विश्वास बडवाईक व गणेश नंदनवार यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल झंझाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन विक्की डोके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौरभ कुथे पाटील, भरत गजपुरे, गौरव दिवटे, जयेश भुते, शुभम कोडपे, गजानन बगमारे, भूषण प्रधान, राकेश बगमारे व विक्की ढोके यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने नामदेव मेश्राम (उद्योजक), मनोज निखाडे, जोसेफ वाढई, माधव वैद्य, अमोल वाघधरे, क्षितिज चहांदे, शत्रुघ्न वैद्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *