मुंबईला महाराष्ट्रातुन तोडण्याचा डाव!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : आगामी संसदेचे अधिवेशनाचे विषय गुलदस्त्यात ठेवण्या मागचे कारण म्हणजे देशाचे अनेक तुकडे होणार आहे आणि यातच मुंबई ला महाराष्ट्रातून तोडून गुजरात ला जोडण्याचे षडयंत्र रचले गेले आहे असा आरोप केंद्रातील मोदी सरकारवर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. रविवारी गोंदिया येथे काँग्रेस पक्षाची जनसंवाद यात्रा निमित्त आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. या बद्दल पुढील आरोप करताना ते म्हणाले की सदर विशेष अधिवेशन हा नव्या संसदेत होणार आहे. आणि येथील खासदारांच्या आसनाची व्यवस्था ही ८०० च्या जवळपास निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे तुकडे व अनेक छोटे छोटे प्रलंबित राज्याची निर्मिती करण्याचा डाव आखण्यात आला असल्याचाही आरोप नाना पटोले यांनी यावेळी केले. महाराष्ट्रात पण मागील काही दिवसांपासूनमराठा ओ बी सी वादाची ठिणगी पेटऊन त्यावर आपली पोळी भाजून घेण्याचे पाप राज्यातील सरकार कडून केले जात आहे. हे महाराष्ट्राचा मणिपूर करू पाहत आहेत. तसेच दोन मोठ्या समाजात तेढ निर्माण करून राज्यात दंगल घडविण्याची यांची तयारी आहे. राज्यात सध्या ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे तसेच कुणबी जातीचे प्रमाणपत्र सरसकट देण्याच्या मागणीला घेऊन जे आंदोलन सुरु आहे.त्या आंदोलनाचे पाप हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे आहे.

भाजपनेच मराठ्यांना चुकीच्या पध्दतीने आरक्षणाकरीता हुलकावणी लावल्याचा आरोप करीत आपण कधीही मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका घेतली नाही. उलट सरकारने जातीय जनगणना करुन लोकसंख्येच्या प्रमाणात काय तो निर्णय घ्यावा असे ही याप्रसंगी पटोले म्हणाले . पटोले पुढे म्हणाले की,जोपर्यंत जातीय जनगणना होत नाही तोपर्यंत या समस्येचा निकाल लागणार नाही. त्यातच ५० टक्केची आरक्षणावर लावलेली मयार्दा हटविण्यात यावे. राज्यातील सरकारचे केंद्रातील सरकार एैकत असल्याने येत्या संसदेच्या विशेष अधिवेशनात आरक्षण ५० टक्केची मयार्दा काढून टाकण्याकरीता राज्य सरकारने पंतप्रधान यांच्याकडे मागणी करुन जनगणना करावी असेही म्हटले. आपण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे असे कधीच बोललो नाही. विरोधी पक्षाचे आमदारांना कमी एैकायला जाते त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. सारथी संस्थेतील कुणबी समाजाच्या समावेशावर मात्र साथीमध्ये कुणबी समाज नसल्याचे पटोलेंचे म्हणने आहे.

काँग्रेसच्या रायपूरच्या राष्ट्रीय अधिवेशनातही जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पारीत करण्यात आला असून मुंबई येथे पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीतही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकार येताच जातनिहाय जनगणना करण्याचा मुद्दा ठेवला आणि त्यास इंडियातील सर्वच पक्षांनी समंतीही दर्शविल्याचे पटोले यांनी सांगितले. सोबतच राज्यातील सरकारला दिड दोन वर्षात पुर्ण मंत्रीमंडळाचे गठण करुन पालकमंत्री नेमता आले नाही याशिवाय दुसरे दुर्देव नसल्याचे टिका करीत राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्याने अनेक योजनांंवर निर्णय होत नसल्याचेही म्हणाले.भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात पाठवण्याची भिती दाखवून आपल्या पक्षात आणने किंवा सोबत आणण्यावर देशातील हुकूमशाहीचे काम सुरु असल्याचेही पटोले या वेळी म्हणाले. पत्र परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे , गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, अमर वराडे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *