मुरदोली घाटाजवळ एलपीजी गॅस टँकर आणि ट्रकचा अपघात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्हयातील देवरी तालुक्याजवळ मुरदोली घाट नजिकच्या राष्ट्रीय महामार्गावर एलपीजी गॅस चा टँकर आणि एक आयशर कंपनीचा ट्रक मागे पुढे जात असतांना समोर जात असलेल्या आयशर कंपनीच्या मोसंबी घेवून जाणारा ट्रकचा टायर अचानक फुटल्याने तो ट्रॅक अनियंत्रित झाला आणि त्यामुळेच त्यांच्या अगदी मागेहून जात असलेला एलपीजीचा एक टँकर ही त्यामुळे अनियंत्रित होवून पालटला असल्याची घटना देवरी तालुक्यातील मरामजोब गावाजवळ शुक्रवार दि. १३ आॅक्टोबरला सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली. या पालटलेल्या एलपीजी टँकरमधून गॅस गळती होत असल्याचे कळाल्यानंतर याबाबतची माहिती मिळताच खबरदारी म्हणून देवरी नगरपंचायत येथील अग्निशमनचे बंब व पथक व जवळील देवरी पोलिस स्टेशन चे पथक घटनास्थळी पोहचले. तसेच गोंदिया येथील आपत्ती व्यस्थापन पथकाला ही येथे पाचारण करण्यात आले होते. व या पुढची खबरदारी म्हणून रायपुर इंडियन आॅईल कंपनीची तांत्रिक चमू देखील घटनास्थळी दाखल झाली. नागपूरची तांत्रिक चमूनी ही घटनास्थळी पोहचून सर्व मिळून या पलटलेल्या टँकर मधील गॅस गळती थांबविण्याचे प्रयत्न केले. पण तो पर्यंत या टैंकर मधून होत असलेली गॅसची गळती थांबविण्यापूर्वी घटनास्थळी आलेल्या अग्निश्मनच्या बंब द्वारे त्या टँकरवर सातत्याने पाणी मारून त्याला थंड करत राहण्याची प्रकिया सुरूच होती.

घटनास्थळी रायपुर आणि नागपूरची इंडियन आॅईलची तांत्रिक चमूनी पोहचून सर्वात आधी पलटलेल्या टँकर मधील गॅस गळती थांबवली व या गॅस गळती थांबल्याची खात्री झाल्यानंतर मग या टैंकर ला सरळ करण्यात आले. ऐरवी नेहमी वर्दळीचा राहणारा हा राष्ट्रीय महामार्ग या गॅस टँकर आणि ट्रॅकच्या अपघातानंतर एक बाजूला गॅसचा टँकर पलटलेल्या अवस्थेत तसेच तिथून गॅस गळती होत असल्याचे लक्षात आल्यानंतर या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली. यामुळे महामार्ग वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याकरिता चांगलीच दमछाक होत होती. पण पलटलेल्या टँकर मधून होत असलेल्या गॅस गळतीमुळे ही सर्व खबरदारी घेण्यात येत होती. अखेर घटनास्थळी पोहचलेल्या इंडियन आईल कंपनीच्या तांत्रिक चमू नी ही गळती एकदाची थांबविल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.

या अपघातासंदर्भात माहिती देतांना एलपीजी गॅस टँकरचे चालक अमृत यादव यांनी सांगितले की, त्यांच्या समोर जात असलेल्या आयशर कंपनीच्या ट्रॅकचा अचानक टायर फुटल्याने तो ट्रॅक अनियंत्रित झाला व त्यामुळे मला पण काही कळले नाही की काय करावे हे एकाएक सुचलं नाही आणि मी चालवत असलेला एलपीजी गॅस चा टँकर सुद्धा त्यामुळेच पलटला असल्याचे सांगितले. तसेच हा अपघात घडल्यानंतर तिथं पोहचून मोलाची भूमिका बजावणारे देवरीचे पोलिस निरीक्षक प्रविण डांगे यांनी सांगितले की, दुपारी ३ वाजेपर्यंत हा मार्ग सुरळीत करण्यात आलेला आहे. नागपूर व रायपुर येथील आलेल्या इंडियन आईलच्या पथकांनी गॅस गळती थांबविल्यानंतर टँकरला जेसीबी मशिनच्या सहाय्याने सरळ करण्यात आले व आठ तासानंतर मार्ग वाहतूकीकरिता मोकळा करण्यात आला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.