बारव्हा येथे ग्रामीण रुग्णालय द्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर: तालुक्यातील केंद्रस्थानी असलेल्या बारव्हा येथे ग्रामीण रुग्णालय देण्यात यावे, अशी मागणी भारतीय युवा बेरोजगार संघटनेचे वतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांना तहसीलदार मार्फत पाठविण्यात आले. तालुक्यातील केंद्रस्थानी असलेल्या आणि मोठी बाजार पेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बारव्हा येथे रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी, सर्व सामन्यांना ग्रामीण रुग्णालय मधून २४ तास उपचार करता यावा म्हणून भारतीय युवा बेरोजगार संघटनेचे वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री (पालकमंत्री) तथा राज्याचे आरोग्य मंत्री यांना लाखांदूरचे तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन सादर करून मागणी केली आहे. तरी तात्काळ ग्रामीण रुग्णालय ला मंजुरी द्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे मागणीद्वारे भारतीय युवा बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष बालूभाऊ चुन्ने यांनी केली आहे. निवेदन देतेवेळी बालूभाऊ चुन्ने, उपसरपंच अनिल कापगते, रवींद्र मेश्राम सदस्य, क्षमा गोंडाणे, सदस्या, रागिणी शेंदरे सदस्या, आशा झोडे सदस्या, ज्योती मानकर सदस्या, शैलेश हर्षे, ललित दाणे, हितेश झोडे, चंद्रहास चव्हान, अजय सोनटक्के, अंकित पगाडे, दिनेश नंदेश्वर, गुलाब नागपुरे, नरेश मानकर, पवन मेश्राम, सुभाष दिवटे, शकील पठाण, रवी येर्णे, संजय झोडे, गजानन झोडे, आनंदराव झोडे, हिरालाल शिवरकर, आनंद विश्वास आदी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *