आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे असंघटीत कामगार विभाग भंडारा शहराची कार्यकारीणी गठीत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आज दि. १७/०६/२०२३ रोज शनिवारला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची असंघटित कामगार विभाग भंडारा शहराची बैठक संजय यरगट्टीवार, अध्यक्ष भंडारा शहर यांचे निवासस्थानी असंघटीत कामगार सेल चे जिल्हाध्यक्ष नरेश ईलमकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये भंडारा शहर कार्यकारीणी निवडीबद्दल चर्चा करण्यात आली. व असंघटीत कामगार विभागाची कार्यकरणी गठीत करण्यात आली. संघटना वाढ व मजबूत कशाप्रकारे करता येईल. याबददल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दिनांक २८/६/२०२३ ला होणाºया सभेबाबत चर्चा करण्यात आली.

शहर अध्यक्ष हेमंत महाकाळकर यांच्या हस्ते कार्यकारीणी गठीत करुन नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने उपस्थित उपाध्यक्ष शकील कुरैशी, महासचिव मोहन खेकाळे, उपाध्यक्ष रामेश्वर पराते, श्रीराम गायधरी, सुखदेवे, अमोल मेश्राम, चंद्रशेखर मेश्राम, राजु सतदेवे, अफरोज खान, निशांत सेलारे व फार मोठया संख्येने शहरी, ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. असंघटीत कामगार विभागाच्या कार्यकारीणीला शुभेच्छा देण्यात आल्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *