गराडा परिसरात बिबट मृतावस्थेत आढळला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा वनक्षेत्रा अंतर्गत येणाºया दवड़ीपार गराडा परिसरातील राखीव वनामध्ये नर बिबट मृतावस्थेत आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती होताच भंडारा वनपरिक्षेत्र अधिकारा संजय मेंढे हे वनकर्मचाºयंसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदर मृत बिबट्याचे वय अंदाजे २ वर्ष असून गडेगाव आगार येथे बिबटचे शवविच्छेदन करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाºयंनी मृत बिबटाची पहाणी केली असता त्याचे सर्व अवयव शाबूत असल्याचे निदर्शनास आले. मृत बिबटाच्या मानेवर व तोंडावर जखमा आढळून आल्या आहेत. पशुवैद्यकीय अधिकाºयंच्या प्राथमिक अंदाजा नुसार सदर बिबट्याचा मृत्यू हा इतर वन्य प्राण्याच्या हल्यात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अधिक तपास उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक भंडारा सचीन निलख व वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा संजय मेंढे हे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *