‘भाजप हटाव’साठी १७ ला जनजागरण रॅली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आयटकच्या भंडारा जिल्हा कौन्सिलची व भाकप च्या जिल्हा सचिव मंडळाची संयुक्त सभा दि. २ डिसेंबर २०२३ ला राणा भवन भंडारा येथे कॉम्रेड माधवराव बांते यांच्या अध्यक्षतेखाली व भाकपचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉम्रेड शिवकुमार गणवीर यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी आयटक व भाकपचे जिल्हा सचिव व दलित अधिकार आंदोलनाचे राज्य सहसचिव कॉ. हिवराज उके यांनी प्रस्तावना व मागील सभेचा आढावा सादर केला. या सभेत कामगार, शेतकरी, कष्टकरी व सर्व सामान्य जनतेचे जगणे मुश्किल करणाºया केंद्र व राज्य सरकार विरोधात आयटकची शाहू जन्मभूमी कोल्हापूर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी नागपूरपर्यंत दिनांक २० नोव्हेंबर पासून सुरू झालेली ‘भाजप हटाव- देश बचाव, संविधान बचाव, कामगार- किसान बचाव’ राज्यव्यापी महासंघर्ष जनजागरण यात्रा दिनांक १६ डिसेंबर २०२३ ला गोंदिया जिल्ह्याचा दौरा करून तिरोडा मार्गे रात्री भंडारा जिल्ह्यात साकोली येथे येणार. दिनांक १७ ला दुपारी साकोली येथे रॅली व सभा घेऊन या जनजागरण यात्रेचे दुपारी ४ वाजता भंडारा येथे आगमन होईल. आणि डॉक्टर आंबेडकर स्मारकापासून गांधी चौकापर्यंत रॅली काढण्यात येईल व जाहीर सभा घेण्यात येईल.

तद्नंतर ही जनजागरण यात्रा मोह- ाडी ला जाईल व तेथील सभा संपवून ही यात्रा रात्री दीक्षाभूमी नागपूरकडे प्रस्थान करेल आणि १८ डिसेंबरला विधानसभेवर विराट मोर्चा काढण्यात येईल. या जनजागरण यात्रेत आयटक वभाकप च्या सर्व सभासदांनी तसेच सर्वसामान्य जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयटक व भाकपचे जिल्हा सचिव कॉ हिवराज उके यांनी केले. आभार कॉ. गजानन पाचे यांनी मानले. तर याप्रसंगी प्रामुख्याने कॉम्रेड शैलेंद्र गणवीर,कॉ. सदानंद इलमे, कॉ. सविता लुटे, भूमिका वंजारी, सुरेश पेठे, दीपक नागमोते, गजानन लाडसे, भूपेश मेश्राम, भगवान मेश्राम, उर्मिला वासनिक, अमरकांता बनसोड, निर्मला माकडे, ज्वाला तिरपुडे, पुष्पा भाजीपाले, वंदना बघेले, रेखा टेंभुर्णेे, अल्का बोरकर, कुंदा भदाडे, राजू लांजेवार, दुर्गा भोयर, वाल्मीक नागपुरे इत्यादींची उपस्थिती होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *