नायलॉन मांजा ठरत आहे जीवघेणा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जानेवारी महिना उजाडला की सर्वांना वेध लागतात ते मकर संक्रांत या सणाचे. मकर संक्रात हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण मानला जातो. मकर संक्रातीनिमित्त पतंगोत्सव साजरा करण्याची आपल्याकडे खूप जुनी परंपरा आहे. रंगीबेरबगी पतंग आकाशात उडवून हा उत्सव साजरा केला जातो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवण्याचा आनंद या निमित्ताने घेत असतात पण अलीकडे हा खेळ जीवघेणा ठरत आहे. पूर्वी पतंग उडवण्यासाठी दोºयाचा किंवा घरगुती मांज्याच्या वापर केला जायचा आता मात्र पतंग उडवण्यासाठी नायलॉनच्या मांज्याच्या वापर केला जातो. हाच नायलॉन मांजा जीवघेणा ठरत असतांना भंडारा शहरातील दुकानात नायलॉन मांजा सर्रास विकला जात आहे. मागील वर्षी नायलॉन मांज्याने गळा कापून अनेक जण गंभीर जखमी झाले होते. नायलॉन मांज्याने अनेक जण जखमी झाले आहेत. या मांज्यामध्ये अडकून आकाशात मुक्त विहार करणारे पक्षीही जखमी होतात, काही पक्षी मरणही पावतात. चिनी बनावटीचा हा मांजा नायलॉन धागा, काचेचा चुरा, लोखंडाचे कण आणि रासायनिक पदार्थांपासून बनवला जातो. नायलॉन मांजा माणसांसह पक्षी आणि प्राण्यांसाठी देखील घातक आहे.

वास्तविक नायलॉन मांजाच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी घालण्याचे आणि वापराबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. मांजामुळे पशुपक्षांना होणाºया दुखापतीचा संदर्भात पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने राज्य सरकारला पत्र पाठवले होते. नायलॉन मांजामुळे वन्यजीव (संरक्षण) अधिनीयम १९७२ अनुसुचितील वन्यप्राणी पक्षांचा मृत्यू झाल्यास किंवा त्यांना दुखापत झाल्यास वन कायद्याच्या ९ नुसार कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने नायलॉन मांज्याच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी घातली होती. महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेली असतानाही हा मांजा दुकानात सर्रास विकला जात आहे. बंदी असूनही काही ठिकाणी लपून छपून तर काही ठिकाणी खुलेआम मांजा विक्री करणाºया विक्रेत्यांवर एक्का दुक्का कारवाई सोडून अनेक ठिकाणी अद्यापही कारवाई होताना दिसत नाही. जो मांजा लोकांना दुकानात खरेदीसाठी मिळतो तोच मांजा प्रशासनाला कसा दिसत नाही? आणखी किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे? प्रशासनाने नायलॉन मांजा विरोधात धडक मोहीम राबवायला हवी. नायलॉन मांजा विकणारा आणि खरेदी करणारा अशा दोघांवर कारवाई व्हायला हवी. नागरिकांनीही नायलॉन मांजाने पंतग उडवण्याऐवजी दोरीचा वापर करून पतंग उडवावी आणि हा उत्सव साजरा करावे, असे आवाहन पक्षीप्रेती तसेच सुजाण नागरिकांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.