सराईत चोरटा जाळ्यात,४ लाखांचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यासह नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर तसेच छत्तीसगड राज्यातील डोंगरगड, राजनांदगाव इत्यादी ठिकाणी घरफोडी करणाºया आंतरराज्यीय सराईत चोरट्याला भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. या चोरट्यावर यापूर्वीचे घरफोडी प्रकरणाचे ५० च्या वर गुन्हे दाखल आहेत. प्रवीण अशोक डेकाटे (वय २७, रा. तिलक वॉर्ड मोहाडी, हल्ली मुक्काम बेसा नागपूर) असे या आरोपीचे नाव आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी आज पत्रकार परिषदेत सदर माहिती दिली. श्री. मतानी यांनी सांगितले की, २७ नोव्हेंबर २०२२ रोजी पालांदूर येथेघरफोडी करुन सोनेचांदीचे दागिने व रोख रक्कम चोरट्याने लंपास केली होती. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पालांदूर पोलिसांचे पथक नेमण्यात आले होते. या गुन्ह्याची कार्यपद्धती पाहिल्यानंतरसंशयाची सुई सराईत गुन्हेगार प्रवीण डेकाटे याच्यावर फिरत होती. प्रवीण डेकाटे याने यापूर्वीच भंडारा जिल्ह्यातील ५० हून अधिक गुन्ह्याची कबुली दिली होती. तसेच नोव्हेंबर २०२१ मध्ये पालांदूरातच त्याने याच पद्धतीने घरफोडी केल्याने त्याला अटक करण्यात आलीहोती. त्यानंतर तो जामीनावर होता. त्यामुळे त्याला अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार रमेश बेदरकर यांना प्रवीण डेकाटे हा कारधा येथील राजस्थानी ढाब्याजवळ असल्याची गुप्त माहिती मिळाली . त्यानुसार रमेश बेदरकर हे कारधा येथे गेले असता त्यांना तिथे प्रवीण सापडला आणि त्याला अटक करण्यात आली. त्याची विचारपूस केली असता त्याने पालांदूर येथे घरफोडीची कबुली दिली. अधिक चौकशी केली असता त्याने भंडारा जिल्ह्यातील भंडारा, वरठी, कारधा, पवनी, गोबरवाही, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, नागपूर जिल्ह्यातील उमरेड, छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव आणि डोंगरगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण १३ घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून ७३ ग्रॅम सोने, दोन दुचाकी आणि एक मोबाईल असा एकूण ४ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, पालांदूरचे ठाणेदार विरसेन चहांदे, पोलिस उपनिरीक्षक प्रीती कुळमेथे, पोलिस हवालदार सतीश देशमुख, रमेश बेदरकर, शैलेश बेदुरकर, ईश्वरदत्ता मडावी, पंकज भित्रे, अन्ना तिवाडे, सनील ठवकर. योगेश पेठे कौशीक गजभिये. समेध रामटेके,नावेद पठाण यानी पार पाडली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *