भंडारा जिल्हा शल्य चिकित्सक पैशासमोर झुकले की, राजकिय दबावाला बळी पडले?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आॅल इंडिया स्टुडंट्स फे- डरेशन च्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयाला निवेदन देण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम हे उपस्थित नसल्याने डॉ. सुहास गजभिये यांना जिल्हा रुग्णालय, भंडारा येथे निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील एका रुग्णालयाला ३० एप्रिल २०२१ मध्ये डॉ. शंकर नाईक यांच्या स्वाक्षरी ने १०० खाटांच्या रुग्णालयाचे बोगस नोंदणी प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याद्वारे देण्यात आले होते. वास्तविक पाहता सदर रुग्णालय सुरु नाही. याची तक्रार करीत सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. यावर कारवाई करीत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत करून कारवाई करण्याचे तोंडी आश्वासन दिले. मात्र तीन आठवडे पेक्षा जास्त कालावधी लोटूनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पुन्हा शल्य चिकित्सक यांना निवेदनाद्वारे स्मरण करून देण्यात आले. लवकरातलवकर कारवाई झाली नाही तर ३ एप्रिल नंतर कधीही आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला आहे. आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन च्या वतीने दिनांक ६ मार्च २०२४ रोजीच्या निवेदनाच्या माध्यमातून भंडारा शहरातील ‘खाजगी रूग्णालय पूर्णपणे बोगस असून शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय भंडारा कार्यलयाअंतर्गत १०० खाटांचे बोगस नोंदणी प्रमाणपत्र सुध्दा देण्यात आले आहे.

सदर रुग्णालयाची चौकशी करून रुग्णालयाची मान्यता रद्द करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप तीन आठवडे पेक्षा जास्त कालावधी लोटूनही कोणत्याही प्रकारची कारवाई शल्य चिकित्सक दिपचंद सोयाम यांच्याकडून करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक व संपूर्ण प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांकडून संशय व्यक्त केला जातअसून पूर्ण यंत्रणा पैशासमोर झुकली की राजकीय दबावाला बळी पडली..? असा सवालही आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन कडून करण्यात येत आहे. येत्या एक आठवड्यात कारवाई झाली नाही तर ३ एप्रिल नंतर कधीही कोणत्याही क्षणी आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन शल्य चिकित्सक व त्यांच्या प्रशासनाविरुद्ध आंदोलन करेल याला जबाबदार शल्य चिकित्सक व संपूर्ण प्रशासन राहील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी शिष्टमंडळामध्ये आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे जिल्हा उपाध्यक्ष कॉ. रवी बावणे यांच्यासह कॉ. विश्वजित बनकर, दिपक मस्के, पूजा लोहारे, वैष्णवी कंगाले इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.