चिन्ह,नाव मिळवण्यासाठी दोन हजार कोटींचा सौदा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करीत निवडणूक आयोगावरच तोफ डागली आहे. शिवसेनेचे चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत दोन हजार कोटी रुपयांचा सौदा आणि व्यवहारझाल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला आहे. हा प्राथमिक आकडा असून, हे १०० टक्के सत्य असल्याचा दावाही त्यांनी केला. संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा एक फोटो आणि काही ओळी शेअर केल्या आहेत. यात त्यांनी निवडणूक आयोगावर अनेकआरोप केले आहेत.संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले सर्व शाखा आमच्याकडेच राहणार शिवसेना भवनासह राज्यभरातील शिवसेनेच्या शाखा कुठेही जाणार नाहीत. उद्धव ठाकरे हेच आमचे सेनापती आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे, शिवसेनेला संपवण्यासाठी वापरलेले तंत्र आहे, असा आरोपही राऊत यांनी केला होता. की, माझी खात्रीलायक माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत दोन हजार कोटी रुपयांचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे. बºयाच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *