नवीन पालकमंत्र्यांची यादी जाहीर.. मा.देवेंद्रजी फडणवीस भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा- बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर अखेर राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भंडारा,नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.तसेच गोंदिया जिल्हा व चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी लागली असून इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार,गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव दादा भुसे- नाशिक,संजय राठोडयवतमाळ, वाशिम,सुरेश खाडेसांगली,संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)उदय सामंत- रत्नागिरी, रायगड, तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धारा-ि शव)रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,अब्दुल सत्तार- हिंगोली,दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,अतुल सावे – जालना, बीड, शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर अशी आहेत.पालकमंत्री वा त्या त्या जिल्ह्यात पालक लाभल्यामुळे आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *