अपघातात आई-आजोबासह चिमुकलीचा मृत्यू ,दोघे गंभीर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी देवरी : अनियंत्रीत चारचाकी वाहन रस्त्याखाली पलटून आई, आजोबा व चार वर्षीय चिमुकलीची मृत्यू झाली. ही घटना ६ फेब्रुवारी रोजी देवरी-चिचगड मार्गावर रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले. शकून अजय ताराम (३५), लीना अजय ताराम (४) रा. पांढरापानी, जि. राजनांदगाव व गयाराम गोकुल उईके (५५), रा.चिपोटा असे मृतकाचे नाव आहे. तर ओमप्रकाश उमेश सोनगडे (१६) रा.ककोडी व वालेश्वरी गयाराम उईके (२३) असे जखमींचे नाव आहे. मृतक व जखमी हे एमएच ३५, एम ०८२४ क्रमांकाच्या स्कॉर्पीओ वाहनाने देवरी-चिचगड मार्गाने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व रस्त्याखालील झाडावर आदळले. हा अपघात एवढा भीषण होता की, यात आई, आजोबा व चार वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान चिचगड पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाकरिता चिचगड ग्रामीण रुग्णालय पाठविले असून वाहनाच्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *