केंद्र व राज्याची संविधान विरोधी भूमिका लोकशाहीला घातक : आमदार नाना पटोले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : संविधानातील “आम्ही” हा शब्द मागे पडत असून प्रत्येक क्षेत्रात वर्तमान परिस्थितीत “मी” पणाचा वावर पुढे आल्याने लोकशाही धोक्यात आलेली आहे. सर्वसामान्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष करून केंद्र सरकार व राज्य सरकारची”मी” पणाची संविधान विरोधी वाटचाल सुरू आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी मंगळवारी दिनांक ७ रोजी केले. ते पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी जि प चे अध्यक्ष गंगाधर जीभकाटे, माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगतेमदनभाऊ रामटेके सभापती, समाज कल्याण, स्वाती वाघाये सभापती, महिला व बालकल्याण, उपसभापती सरिता करंजेकर ,जि.प. सदस्य नारायण राजाराम वरठे, जि.प. सदस्या माहेश्वरी नेवारे, सदस्या, दिपलता समरीत, सदस्या शितल राऊत , सदस्या वनिता डोये, तालुका काँग्रेस अध्यक्ष व पं.स. सदस्य होमराज कापगते, उपमुख्य कार्यपालन अधिकारी सचिन पानझाडे ,गटविकास अधिकारी के डी टेंभरे व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

नाना पटोले पुढे म्हणाले की अपघात, पार्किंग व्यवस्था व वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता भावी पिढीला सुरक्षित व सोयीची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालय तसेच पंचायत समितीची नवीन इमारत राष्ट्रीय महामार्गावरून सोयीच्या ठिकाणी बांधण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य नागरिकांची कामे करीत असताना जनतेच्या सोयींचा सर्वकश विचार करावा. साकोली विधानसभा क्षेत्राच्या जनतेने दिलेल्या ताकदीमुळे राज्याच्या अर्थसंकल्पात साकोली विधानसभा क्षेत्राचा उल्लेख करण्यात आला यामुळे हजारो कोटी रुपयांची विकास कामे विधानसभा क्षेत्रात आणण्यात आली. पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेवर व्हावी त्यांना गैरसोय होणार नाही व त्यांना न्याय मिळेल असे आव्हान याप्रसंगी नाना पटोले यांनी केले. याप्रसंगी अध्यक्षीय भाषण गंगाधर जीभकाटे, सभापती मदन रामटेके, माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते, स्वाती वाघाये , जि प सदस्या माहेश्वरी नेवारे इत्यादींनी संबोधित केले. आमदार नाना पटोले यांनी पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे फीत कापून लोकार्पण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पं. स. सभापती गणेश आदे, आभार प्रदर्शन के.डी.मेळे यांनी केले. या लोकार्पण सोहळ्याला सर्व पंचायत समिती सदस्य , सर्व विभाग प्रमुख अधिकारी, कर्मचारी व तालुक्यातील अंगणवाडी सेविका, सरपंच, गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *