लांडग्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी . लाखांदूर : शिकारीच्या शोधात जंगलातून भटकून गावात प्रवेश केलेल्या लांडग्यांनी घरालगत गोट्यात बांधलेल्या दोन शेळ्यावर हल्ला चढवून दोन शेळ्या फस्त केल्या. ही घटना तालुक्यातील टेभरी येथे २ आॅक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली . नवनाथ गोपाल मेश्राम नामक पशुपालकाचे २० हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेच्या एक दिवसापूर्वी रात्रीच्या सुमारास पीडित पशुपालकांनी आपल्या शेळ्या स्वत:च्या राहत्या घरालगतच्या गोठ्यात बांधल्या होत्या. रात्रीच्या सुमारास लांडग्यांनी गोट्यात बांधलेल्या हल्ला चढविला. गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्यांना जवळच्या शेतशिवारात ओढत नेऊन शिकार केली . दुसºया दिवशी दुसºया दिवशी सकाळी नवनाथ हे शेळ्या सोडण्यासाठी गोठ्यात गेले असता शिळ्या दिसून आल्या नाही. त्वरित शेत शिवारात शेळ्यांचा शोध घेतला दोन्ही शेळ्या मुर्तवस्थेत. शेतात आढळून आल्या . या घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक हात्ते यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला . नवनाथ मेश्राम पशु पालकांनी नुकसान भरपाई ची मागणी केली आहे .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *